मोटार सायकली वरील दोन अज्ञात चोरट्याने महिलेच्या गळ्यातील पोथ चोरून केला पोबारा…
सर्क्युलर रोडवरील घटना...

सर्कुलर रोडवर मोटार सायकली वरील दोन अज्ञात चोरट्याने महिलेच्या गळ्यातील पोथ चोरून केला पोबारा…
बुलढाणा
बुलढाणा शहरातील सर्क्युलर रोडवर महिलेच्या गळ्यातून सोन्याची पोथ मोटार सायकल वरून मागून येणाऱ्या दोन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातली पोथ महिलेच्या चालत्या गाडीवरून हिसकावून चोरून नेल्याची घटना घडली सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली आहे.
प्राप्त माहितीनुसार सौ दीपिका निलेश अग्रवाल वय वर्ष 38 ह्या मुलाला ट्युशनला सोडण्यासाठी गेल्या व परतत असताना चिखली रोड कडे जात होत्या त्यांच्या मागून दोन अज्ञात व्यक्ती मोटार सायकल वरून मागून आले आणि त्यातील मागे बसलेल्या व्यक्तीने महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची पोत चोरून चिखली रोड कडे पोबारा केला या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली यानंतर शहर पोलीस स्टेशन येथे फिर्यादी सौ दीपिका निलेश अग्रवाल यांनी दिलेल्या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्याने विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास psi रवी मोरे करीत आहे.
शहरात चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली काही काही दिवसा अगोदर म्हाडा कॉलनीतील पत्रकाराच्या घरातही अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून लाखांचा मुद्देमाल पळवला व आज पुन्हा दिवसा सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोथ चोरून नेल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे