राजकीय बातमी

अन्यथा जिल्ह्यातील 7 विधानसभा स्वतंत्रपणे निवडणूका लढविणार.. नरहरी गवई आरपीआय जिल्हाध्यक्ष

 

अन्यथा जिल्ह्यातील 7 विधानसभा स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय…

बुलढाणा
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हा आढावा बैठक बुलढाणा येथील नर्मदा हॉल येथे आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष नरहरी गवई यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी सोबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची युती असून लोकसभेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ला एकही जागा देण्यात आली नाही परंतु विधानसभेत वीस ते पंचवीस जागा या रिपब्लिकन पक्षाला मिळाव्यात अशी मागणी महाराष्ट्रभरातील पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. त्याच अनुषंगाने बुलढाणा जिल्ह्यातील 7 विधानसभेच्या जागे पैकी 2 विधानसभेची मागणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

यामध्ये मेहकर राखीव विधानसभा व चिखली या दोन विधानसभेचा समावेश आहे.
या दोन विधानसभा संदर्भात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले यांच्याकडे मागणी करणार आली असून दोन पैकी एक तरी जागा रिपब्लिकन पक्षाला सोडण्यात यावी अन्यथा जिल्ह्यातील सातही विधानसभा मध्ये स्वतंत्रपणे उमेदवार उतरवणार असल्याची घोषणा या जिल्हा आढावा बैठकीत घेण्यात आली यावेळी मंचकावर जिल्हाध्यक्ष नरहरी गवई, रामेश्वर जी वाकोडे,प्रा मुक्तार खा पठाण, आम्रपाल वाघमारे,सौ वंदनाताई वाघ,सौ आशाताई वानखेडे, मुरलीधर जी गवई भाऊसाहेब सरदार नवाब मिर्झा, दत्ता राहणे पाटील,केशवराव सरकटे,निळकंठ सोनवणे, हिम्मतराव जाधव,बाबूलाल इंगळे,बाळासाहेब अहिरे,संतोष वानखेडे,सुरज शेगोकार,दिलीप इंगळे,रमेश पिंपळे,भागवत भाऊ साळवे,रामदास आढागळे,शैलेश वाकोडे, रोशनी ताई कबीरदास
व असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

*रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या या निर्णयामुळे मेहकर आणि चिखली विधानसभेत महायुतीत बिघाडी असल्याचं चित्र बघायला मिळत आहे.
कारण मेहकर विधानसभेत शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय रायमुलकर आहेत तर चिखली विधानसभेत भाजपाच्या श्वेता महाले या आमदार आहेत आणि या दोन्ही जागेवर आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने दावा करण्यात आला आहे.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button