बातमी

अभ्यासातील सातत्य आणि चिकाटीनेच यशाचे शिखर गाठता येते – आमदार रवी राणा

अभ्यासातील सातत्य आणि चिकाटीनेच यशाचे शिखर गाठता येते – आमदार रवी राणा

 

बुलडाणा,(प्रतिनिधी)- दहावी व बारावीतील गुणवत्ता प्राप्त यादीमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यासाठी तसेच भविष्यामध्ये त्यांना याहीपेक्षा यश मिळाव याकरिता विद्यार्थ्यांचे मनोबल वाढावे हा उद्देश समोर ठेवून गेल्या विसवर्षापासून दरवर्षी गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्काराचे तसेच दिल्ली दर्शनाची च्यारसे साडे च्यारसे विद्यार्थांच्या सहलीचे नियोजना मध्ये संसद कामकाज कसे चालते व इतर प्रेक्षणीय स्थळे दरवर्षी दाखवीले जातात त्यांचा राहण्याचा खाण्यापिण्याची ही सर्व खर्च ते स्वतः रवि राणा करतात कारण शिक्षण हे विकासच माध्यम आहे मुले ही भारताचे आधारस्तंभ आहे म्हणून मुलांना विविध उपक्रम राबवून त्यांना प्रोत्साहित कसे करता येईल व त्यांना मुख्य प्रवाहात कसे आणता येईल म्हणून अशा कार्यक्रमाचे आयोजन बंडनेरा विधान सभेचे लोकप्रिय आमदार रविभाऊ राणा व लोकप्रिय अभिनेत्री तथा अमरावती लोकसभा मतदार संघाच्या लोकप्रिय माजी खासदार भाभी नवनित राणा दांपत्य गोरगरीबांना मदतीचे,धार्मिक ,सामाजिक लोकोपयोगी उपक्रम नेहमीच राबवीत असतात कारण रवी राणानी जवळून गरिबीचे चटके भोगले आहे म्हणून गरिबी काय असते हे त्यांना माहीत आहे म्हणून गोरगरिबांना नेहमीच मदतीचा हात पुढेच असतो.
तसाच विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी त्या अनुषंगाने यावर्षी सुध्दा भाजपा व युवा स्वाभिमान पार्टीच्या संयुक्त विद्यमाने संस्कृतीक भवन अमरावती येथे ४८७० गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. या भव्य दिव्य सत्कार सोहळ्याला राज्यसभेचे खासदार डॅा.अनिल बोंडे, आ.प्रविण तायडे, भाजपाजिल्हाध्यक्ष डॅा.नितीन धांडे, ग्रामीणजिल्हाध्यक्ष रविराज देशमुख, युवा स्वाभिमानी पार्टीचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष शैलेंद्र कस्तूरे, यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी आमदार रवि राणा, मा. खा. नवनित राणा यांच्यासह उपस्थित सर्व मान्यवरांनी महापुरुषांच्या प्रतिमेचे पुजन केले करून सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाला औपचारिक रित्या सुरुवात झाली. ४८७० गुणवंतांचा स्कूल बॅग, भेटवस्तू प्रदान करून सत्कार करण्यात आला व तसेच त्यांच्या आईवडीलांचा ही सत्कार करण्यात आला. तसेच ह्या सत्कारांची फोटोग्राफी विद्यार्थ्यांच्या जीवनात जीवनभर आठवण राही म्हणून त्यांची फोटोग्राफी प्रत्येक विद्यार्थ्याला फ्रेम करून घरपोच देण्यात येणार.
यावेळी आ.रवि राणा, खासदार डॉ अनिल बोंडे, मा. खा. नवनित राणा, युवा स्वाभिमानी पक्षाचे राष्ट्रीयकोषाध्यक्ष शैलेंद्र कस्तूरे यांच्यसह अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.


आमदार रवि राणा यांनी आपले मनोगत व्यक्त करताना व विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करतांना सांगितले की, विद्यार्थ्यांनी उच्च विभुशित होण्यासाठी व आपले ध्येय साध्य करण्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासातील सातत्य चिकाटी जिद्द ठेवून परिश्रम करावेत. आपली दिशा निश्चित करावी. आपल्या महापूरूषांचा आदर्श समोर ठेऊन व आईवडिलांच्या कष्टाची प्रत्येक विद्यार्थ्याने जाणीव ठेवून अभ्यास करावा अभ्यासातील सातत्यामुळे यशाचे उंच शिखर गाठता येते, स्वत:चा अनुभव सांगतांना म्हणाले की, मी एका कामगाराचा (हामालाचा) मुलगा आहे हमालाचा मुलगा ही उच्च यशाचे शिखर गाठू शकतो ते मी दाखवून दिले आहे. त्यासाठी स्वतः जिद्द चिकाटी व अभ्यासुवृत्ती अंगी असली पाहिजे व ती माझ्या अंगी होती म्हणून मला कोणताही राजकीय वारसा नसताना मी पंधरा वर्षापासून आमदार आहे हे काही माझ्या जीवनात बद्दल झाला तो शिक्षणा मुळे झाला म्हणून आपण शिक्षण घ्या शिक्षण हे वाघीनीचे दुध्द आहे ते प्राशन केले की, मनुष्य गुरगुरल्या शिवाय राहत नाही म्हणून शिक्षण घ्या शिक्षणामुळेच जीवनातील आशा आकांक्षा पूर्ण होतात म्हणून “ वाचाल तर वाचाल “ असे विचार आमदार रवि राणा यांनी व्यक्त केले.
मा.खा. नवनित राणा यांनी आपले विचार व्यक्त करतांना विद्यार्थ्यांना यश मिळविण्याकरीता सर्वप्रथम प्रामाणिक व ठामपणे यश मिळवीण्यासाठी पॅाझिटीव्ह भुमीकेत मैदानात उतरावे जिंकण्याची वा हरण्याची परवा न करता आपले प्रयत्न सुरू ठेवावे यश हमखास मिळते.
युवा स्वाभिमानीचे राष्ट्रीयकोषाध्यक्ष शैलेंद्र कस्तूरे विद्यार्थांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, प्रत्येक विद्यार्थीने परिस्थितीवर मात करून शिक्षणाला महत्वाचे स्थान दिले पाहिजे. मानसाला यश मिळवायचे असेल तर मनातील भीती पहिल्यांदा दुर केली पाहिजे. सतत प्रयत्न केले पाहिजेत. मनाने जे लोक हरतात ते रणांगणात कधिच जिंकू शकत नाहीत. आयुष्यात जेवढा मोठा संघर्ष तेवढी मानसाची उंची मोठी असते, म्हणून विद्यार्थ्यांनी आपली उंची व सर्वांगीन विकासासाठी वाचन केले पाहिजे असे प्रतिपादन शैलेंद्र कस्तूरे यांनी केले.
या कार्यक्रमाचे संचलन युवा स्वाभिमानचे प्रवक्ते नाना आमले व प्रतिक्षा डांगे यांनी केले. कार्यक्रमाला जयंतराव वानखेडे, माजी नगर सेवक तथा शिक्षण सभापती आशिष गावंडे, युवा स्वाभिमानचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष शेख मक्सूद, सुनिल काळे, डॅा. आशिष मालू, सुनिल राणा, विनोद जैस्वाल, हुसेन सुभेदार, प्रा. अजय गाडे, कमलकिशोर मालानी, ज्योती सैरिसे, संजय हिंगासपुरे, सोनाली नवले, सुखदेव तरडेजा, अजय देशमुख, रविंद्र गवई, सद्दाम हुसेन, उमेश ढोणे, विनोद गुहे, कीरण अंबाडकर, तमीज शाहा, गौतम हिरे, देवानंद राठोड, संध्या रामटेके, सुमती ढोके, अर्चना तालन, चंदा लांडे, ललीत समदुरकर, चंदा लांडे आदी भाजपा, युवा स्वाभिमानचे पदाधिकारी, असंख्य विद्यार्थी, पालकवर्ग उपस्थित होते.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button