*अमरावती विद्यापीठ मॅनेजमेंट कौन्सिल सदस्य डॉ राधेशाम सिकची यांनी दिली मॉडेल डिग्री कॉलेजला सदिच्छा भेट …*

*अमरावती विद्यापीठ मॅनेजमेंट कौन्सिल सदस्य डॉ राधेशाम सिकची यांनी दिली मॉडेल डिग्री कॉलेजला सदिच्छा भेट …*
बुलढाणा ( प्रतिनिधी)
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ द्वारा संचालित बुलढाणा येथील मॉडल डिग्री कॉलेजला अमरावती विद्यापीठ मॅनेजमेंट कौन्सिल सदस्य डॉ राधेशाम सिकची यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली
मॉडेल डिग्री कॉलेजचे मानद संचालक डॉ अण्णासाहेब म्हळसणे यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक कार्यक्रम आणि महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती यावेळी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ मॅनेजमेंट कौन्सिल सदस्य डॉ राधेशाम सिकची यांना दिली नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी प्राध्यापकांची भूमिका ही महत्त्वाची असल्याच त्यांनी यावेळी त्यांनी नमूद केलं महाविद्यालयात प्राध्यापकांसोबत त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सुख सुविधे संदर्भात ही त्यांनी माहिती घेतली यावेळी मॉडेल डिग्री कॉलेज येथील प्राध्यापक प्राध्यापक इतर कर्मचारी उपस्थित होते .