बातमी

अहिल्यानगर मॅरेथॉन मध्ये बुलढाणा येथील महिलांचा व पुरुषांचा उत्स्फूर्त सहभाग

अहिल्यानगर मॅरेथॉन मध्ये बुलढाणा येथील महिलांचा व पुरुषांचा उत्स्फूर्त सहभाग

 

दिनांक एक जून 2025 रोजी अहिल्यानगर सायकलिंग क्लब तर्फे भारतीय आर्मी ऐतिहासिक मॅरेथॉन सीजन फोर आयोजन केले होते
.सदर मॅरेथॉनमध्ये बुलढाण्यातील 35 महिला व पुरुषांनी सहभाग नोंदवला. बुलढाणा च्या इतिहासात पहिल्यांदाच महिलांनी बाहेरगावी जाऊन इतक्या मोठ्या प्रमाणात मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदविला. महिलांनी भाग घेऊन त्यांच्या जोशाने चिकाटीने आणि मेहनतीने संपूर्ण गावाला एक नवा आयाम दिला आहे. गेल्या तीन महिन्यापासून अथक परिश्रम करून या ज्ञानगंगा रणरागिनी क्लबच्या महिलांनी उस्फूर्त सहभाग नोंदवून मॅरेथॉनमध्ये आपली छाप उमटवली. ऐतिहासिक अहमदनगर भुईकोट किल्ला परिसरात आर्मीच्या सुंदर स्वच्छ परिसरात मॅरेथॉन आयोजित केली होती. पाच किलोमीटर दहा किलोमीटर 21 किलोमीटर आणि 42 किलोमीटर अशा स्पर्धेमध्ये अनेक महिला व पुरुषांनी सहभाग नोंदविला . दहा किलोमीटरच्या स्पर्धेमध्ये अनिता कापरे जयश्री राखोडे ,डॉक्टर अश्विनी जाधव ,कीर्ती चौधरी, सुनिता पुजारी, प्रतिभा बोडखे,नंदा चाटे ,सीमा डुकरे, सोनाली वाघ , डॉ वर्षा तांगडे ,डॉ अर्चना ठोसरे ,पौर्णिमा इंगळे, डॉ विद्या घोगटे ,वैशाली काळवाघे, डॉ शितल भोपळे,प्रियांका सुरुशे, शितल सवडतकर या महिलांनी मेडल मिळवले तर कौस्तुभ जोशी , मंगेश काकडे,विवेक सुरुशे, ज्ञानेश्वर सवडतकर ,गजानन डुकरे यांनी सुद्धा या दहा किलोमीटरच्या मॅरेथॉन मध्ये सहभाग नोंदवून मेडल मिळवले तर 21 किलोमीटर मध्ये बुलढाण्याच्या स्वाती शेळके या एकमेव महिलेने भाग घेऊन मेडल मिळवले त्याचप्रमाणे 21 किलोमीटरच्या स्पर्धेमध्ये पुरुषांमधून शुभम बारोटे, गजानन वरडे, गजानन पाटील ,मोहन घोंगटे सर,यांनी सहभाग नोंदविला मेडल मिळवले. कुमारी ओवी जाधव व कुमारी मनस्वी भोपळे या चिमुकल्यांनी सुद्धा तीन किलोमीटरच्या धावण्याचे स्पर्धेत भाग घेऊन मेडल मिळवले. त्याचप्रमाणे 42 किलोमीटरच्या फुल मॅरेथॉन मध्ये ऍड. शरद राखोंडे ,संदीप शेळके,रवींद्र पाटील,प्रसाद पत्की यांनी सहभाग नोंदविला मेडल मिळवले. तर गौरवाची बाब म्हणजे ऍड शरद राखोंडे हे वय वर्ष 50 वर्षावरील वयोगटात दुसरे विजेते ठरून त्यांनाआहे पोडियम मिळाले. ज्ञानगंगा रणरागिणी महिला ग्रुप तर्फे बुलढाणा मध्ये आरोग्य चळवळ मोठ्या प्रमाणात सुरू झाली असून यामध्ये अनेक महिला पुरुष सहभाग घेऊन स्वतःचा आरोग्य चांगलं राहण्याचा संदेश घेतात अहिल्यानगर ज्याला आपण अजून आपल्या ऐतिहासिक वारसा साठी ओळखले जाते ते आता गौरव फिरोदिया व नगर सायकलिंग क्लब मुळे धावण्याच्या आणि आरोग्यवर्धनाच्या चळवळीचा केंद्रस्थानी आले आहे. मॅरेथॉन मध्ये केवळ धावपटूंनीच नव्हे तर गावातील सर्व उत्साही महिला पुरुषांनी यामध्ये भाग घेऊन मॅरेथॉन यशस्वी केली बुलढाण्याच्या इतिहासामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला पुरुषांनी मॅरेथॉनमध्ये भाग घेतल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button