आंतरराष्ट्रीय पत्र लेखन स्पर्धेचे भारतीय डाक विभागाच्या वतीने आयोजन…
स्पर्धेत सहभागी होण्याचे डाक अधीक्षक श्री गणेश अंभोरे यांचे आवाहन

आंतरराष्ट्रीय पत्र लेखन स्पर्धेचे भारतीय डाक विभागाच्या वतीने आयोजन…
बुलढाणा भारतीय डाक विभागामार्फत दिनांक ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय पत्र लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे
भारतीय टपाल विभाग तर्फे युपीयू आंतरराष्ट्रीय पत्रलेखन स्पर्धा दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आयोजित करण्यात आली आहे या पत्रलेखन स्पर्धेत मित्र आणि मैत्रिणीला पत्र लिहिण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार असून विद्यार्थ्यांना आपले विचार पत्रलेखनातून मांडणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे
डिजिटल जगात मानवी संबंध का महत्त्वाचे या विषयावर आपल्याला मित्र आणि मैत्रिणीला पत्र लिहायचे आहे
ही स्पर्धा आठ मार्च 2026 रोजी आयोजित करण्यात आली असून शालेय स्तरावर ही स्पर्धा सात मार्च 2026 शनिवार रोजी आयोजित केली जाणार आहे या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन डाक अधीक्षक बुलढाणा श्री गणेश अंभोरे यांनी केले आहे
*राष्ट्रीय स्तरावरील बक्षिसे*
प्रथम बक्षीस 50 हजार रुपये व प्रमाणपत्र
द्वितीय बक्षीस 25 हजार रुपये आणि प्रमाणपत्र व
तृतीय बक्षीस 10 हजार रुपये आणि प्रमाणपत्र
*सर्कल स्तरावरील बक्षीसे*
प्रथम पारितोषिक 25 हजार रुपये आणि प्रमाणपत्र
द्वितीय बक्षीस 10 हजार रुपये आणि प्रमाणपत्र तर
तृतीय बक्षीस 5 हजार रुपये आणि प्रमाणपत्र असे बक्षीसाचे स्वरूप असणार आहे
*पात्रता*
वय वर्ष 9 ते 15 या वयोगटातील सर्व विद्यार्थी या स्पर्धेसाठी पात्र असणार आहेत तर 800 शब्दांच्या मर्यादेत पत्रलेखन विद्यार्थ्यांना करावयाचे आहे



