बातमी

*आझाद समाज पार्टी (कांशीराम भीम आर्मी) च्या वतीने बहुजन संवाद संमेलन संपन्न….

*आझाद समाज पार्टी (कांशीराम भीम आर्मी) च्या वतीने बहुजन संवाद संमेलन संपन्न….

 

देशभर खासदार भाई चंद्रशेखर आझाद यांच्या विचारसरणी ने अनेक युवा तरुण विविध जाती-धर्माचे समाज बांधवांना भाई चंद्रशेखर आझाद यांच्या विचारधारेने प्रभावित होऊन. आझाद समाज पार्टीमध्ये सामील होत आहेत. दिनांक 11 ऑगस्ट 2024 ला साखरखेर्डा आशीर्वाद लॉन्स या ठिकाणी आझाद समाज पार्टी (भीम आर्मी)च्या वतीने बहुजन संवाद संमेलन चे आयोजन करण्यात आले या संमेलनाला मुख्य मार्गदर्शक म्हणून जिल्हाध्यक्ष भाई सिद्धांत वानखेडे होते . याप्रसंगी विविध विषयासंबंधी मार्गदर्शन तथा चर्चा करण्यात आली. त्यामध्ये बहुजन समाजातील युवकांची वाढती बेरोजगारी, बहुजन समाजातील युवकांना व्यवसाय क्षेत्र निवडीच्या विषयी मार्गदर्शन तसेच राजकीय व सामाजिक विषयी चर्चा करण्यात आली ,बहुजन समाजातील अतिक्रमण धारक शेतकऱ्यांचे प्रश्न यावर उपाय कशा पद्धतीने केल्या जातील यावर सुद्धा चर्चा व विमश करण्यात आले. युवकांनी शिक्षणासोबत कायदेविषयक शिक्षणा ची सुद्धा जोडधरावी कायदेविषयक शिक्षण ही काळाची गरज आहे .अशा विविध सामाजिक विषयासंबंधी चर्चा विमश करण्यात आले. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजन भाई संदीप इंगळे व प्रवीण भाऊ गवई यांनी त्यांच्या सहकार्या समवेत केले या संमेलना प्रसंगी प्रमुख उपस्थितीत पत्रकार सचिन खंडारे तसेच जिल्हा सदस्य राहुल भाई शिरसाट, भिमाभाई काकडे, सरकटे साहेब, खामगाव तालुका अध्यक्ष मयूर खंडारे ,संजय निकाळजे उपस्थित होते यावेळी शेकडो कार्यकर्ते आझाद समाज पार्टी (भीम आर्मी) मध्ये सामील झाले. यावेळी अतिशय उत्स्फूर्तपणे युवा तरुण वर्गाचा या संमेलनासाठी सहभाग होता त्यामध्ये समाधान गवई, राहुल मोरे, सावंत सरकटे, त्रिभूषण गवई, एम .डी नदीम ,अवी गवई, प्रणव गवई ,यश जाधव, रोहित मोरे, विवेक गवई, सुयश गवई ,साहिल भालके, प्रेम अंभोरे कुणाल गवई ,विशाल चव्हाण, पंकज ताजने ,करण गवई, प्रतीक गवई इत्यादी एक ना शेकडो कार्यकर्त्यांचा युवा वर्गाचा सहभाग या संमेलनासाठी दर्शविला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्य आयोजक भाई संदीप इंगळे तर आभार प्रवीण भाऊ गवई यांनी केले समाज बांधवांच्या व युवा वर्गांच्या अतिशय जल्लोषात व उत्स्फूर्तपणे हा कार्यक्रम पार पाडला .

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button