बातमी

आ गायकवाड यांचा जनता दरबारात धनगर, नाथ जोगी समाजाच्या समस्यावर ऑन द स्पॉट निवारण

हसत हसत परतले धनगर, नाथजोगी समाजातील घटक

बुलडाणा,

शासनाच्या विविध योजनाच्या लाभासाठी विविध कागदपत्रांची आवश्यकता असते, या कागदपत्राची पूर्तता होत नसल्याने नाथजोगी व धनगर समाज त्रस्त होवून आमदार संजय गायकवाड यांनी बोलाविलेल्या जनता दरबारात पोहचले होते. या ठिकाणी त्यांच्या समस्यावर आ गायकवाड यांनी ऑन द स्पॉट निवारण करत न्याय दिल्याने आलेले धनगर व नाथजोगी समाजातील घटक हे हसत हसत आनंदाने परतले.

बुलडाणा विधानसभा मतदार संघ अंतर्गत राहणाया धनगर व नाथजोगी समाजातील अनेकांकडे अपुरे कागदपत्रे असल्याने त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नव्हता सदर समाज भटकंती करणारा असल्याने यांच्याकडे रेशन कार्ड, जन्म मृत्यू दाखला नसल्याने शासकीय योजनाचा लाभ यांना मिळत नव्हता.समाजाच्या वतीने अनेकवेळा अधिकायाकडे आपल्या मागण्यांचे गरहाने मांडले मात्र त्यांना त्या ठिकाणी न्याय मिळाला नाही. त्यामुळे या लोकांनी आमदार संजय गायकवाड यांच्या कानावर आपल्या समस्या टाकल्या त्यावर  आमदार संजय गायकवाड यांनी आज निमखेड फाटा येथे शासकीय अधिकाऱ्या सोबत जनता दरबाराचे आयोजन केले.  त्या ठिकाणी ऑन द स्पॉट निर्णय घेत अनेकांना विविध दाखले देण्यात आले.  धनगर नाथ जोगी व इतर समाजातील व्यक्तींना शासनाकडून मिळणाऱ्या   रेशन कार्ड वाटप, नॅनो युरिया वाटप, जन्माची नोंद, मृत्यूचे दाखले, विवाह नोंदणी ऑनलाईन करणे आधी प्रश्नांचा ऑन द स्पॉट निपटारा करण्यात आला.  जनता दरबारासाठी आलेल्या नागरिकांनी आपले प्रश्न या ठिकाणी मांडले, याची दखल घेत आमदार धर्मवीर संजू भाऊ गायकवाड यांनी हे प्रश्न तातडीने मार्गी लावले, यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा कृषी अधिक्षक ढगे साहेब, तहसीलदार हेमंत पाटील, गटविकास अधिकारी समाधान वाघ, तालुका कृषी अधिकारी अंगाईत यांच्यासह ग्रामसेवक तलाठी व कर्मचारी उपस्थित होते यावेळी  धर्मवीर आमदार संजू गायकवाड यांनी जनतेचे प्रश्न मार्गी लागल्याबद्दल त्यांच्या कार्याविषयी समाज बांधवांनी कृतज्ञता व्यक्त केली

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button