आ.संजय गायकवाड, पूजा गायकवाड यांच्या हस्ते मा जीजाऊची महाआरती

51 तोफाची देन्यात आली सलामी, कर्तुत्ववान महिलांचा सम्मान
बुलढाणा राजमाता राष्ट्रमाता मा जिजाऊ यांच्या जन्मोत्सवानिमित्त बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौक परिसरात बुलढाण्याचे धडाडीचे आमदार संजय गायकवाड माजी नगराध्यक्ष पूजा गायकवाड यांच्या हस्ते महाआरती करण्यात आले यावेळी 51 तोफांची सलामी देण्यात आली त्यानंतर जिल्ह्यातील चार कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला सदर कार्यक्रम सकाळी नऊ वाजता दरम्यान पार पडला.
स्वराज्याची स्थापना करण्याचे ध्येय बाळगणाऱ्या राजमाता राजमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवा निमित्त बुलढाणा येथे दरवर्षी उत्साहात कार्यक्रम घेण्यात येतात यावर्षी देखील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या वतीने शहरातील जयस्तंभ चौक परिसरात राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ त्यांच्या प्रतिमेचे वंदन केले त्यानंतर आमदार संजय गायकवाड व माजी नगराध्यक्ष पूजाताई गायकवाड यांनी जिजाऊ ची महाआरती केली.
यावेळी सर्वप्रथम बुलढाणा मतदार संघाचे आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या हस्ते राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या भव्य दिव्य प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले, त्यानंतर बाल शिवरायांच्या प्रतिमेला युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांनी पुष्पहार अर्पण केला तसेच पूजन केले. मा.नगराध्यक्ष सौ पुजाताई संजय गायकवाड यांच्यासह सौ मयुरी मृत्युंजय गायकवाड,सौ रोहिणी मयूर बाहेकर, सौ सुमनताई दिलीप गायकवाड,सौ राजश्री सचिन गायकवाड,मीनाताई रमेश गायकवाड,स्वातीताई आशिष जाधव, सौ शितलताई संदीप गायकवाड,श्रेयाताई श्रीकांत गायकवाड,नेहाताई शेषराव काटकर, सौ कल्याणी नितीन जवंजाळ,सौ.संध्या संतोष जंजाळ,वैशालीताई ठाकरे,अंजलीताई परांजपे, गायत्रीताई सावजी, सौ अंजनाताई खूपराव, सौ वर्षाताई तायडे,सौ घट्टे ताई,सौ वैशालीताई पारस्कर, सौ पिंकीताई मनीष जाधव,शोभाताई पाटील, रामेश्वरीताई चव्हाण, सौ शांताबाई जतकर, यांच्यासह असंख्य महिलांनी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँ साहेब यांचा दुग्धाभिषेक करून पूजन केले. त्यानंतर हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची महाआरती, माँसाहेब जिजाऊ यांना जिजाऊ वंदनेने आदरांजली सर्वांच्या उपस्थितीमध्ये देण्यात आली
यावेळी युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड,धर्मवीर आखाडा अध्यक्ष पृथ्वीराज संजय गायकवाड,युवासेना शहर प्रमुख श्रीकांत गायकवाड,माजी आरोग्य सभापती आशिष जाधव, किसान सेना जिल्हाप्रमुख संदीप गायकवाड, मल्हारी दिलीप गायकवाड, सचिन विलास गायकवाड, सो प्रचिती माडिवाले,यांनी जिजाऊ वंदना गायली तसेच सूत्रसंचालन प्राध्यापक अमोल वानखेडे तसेच आभार प्रदर्शन प्राध्यापक अनिल रिंढे यांनी केले, यावेळी माँसाहेब जिजाऊप्रेमी व शिवप्रेमी जास्तीत जास्त संख्येने हजर होते..
कर्तृत्ववान महिलांचा करण्यात आला सन्मान
*समाजासाठी ज्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले अशा काही कर्तृत्वाने महिलांचा यावेळी सन्मान धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड तसेच सौ पुजाताई संजय गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला, यामध्ये पळसखेड सपकाळ येथील सेवा संकल्प प्रतिष्ठानच्या सौ.आरतीताई नंदकुमार पालवे,यशस्वी उद्योजिका सौ कविताताई अरुण गारोळे, ०२ एकर शेतीवर बचत गटाच्या माध्यमातून आपली उत्पादने कर्नाटकपर्यंत पोहोचवली अशा यशस्वी उद्योजिका,सौ वंदनाताई टेकाळे यांचा समावेश आहे.
51 तोफांची देण्यात आली सलामी
शहराच्या ज्येष्ठ चौक परिसरात आयोजित जिजाऊ मानवंदना कार्यक्रमादरम्यान पुणे येथील एका कंपनीच्या वतीने राजमाता राष्ट्रमाता मा जिजाऊ यांच्या महाआरतीनंतर 51 तोफांची सलामी देण्यात आली यावेळी उपस्थित आणि टाळ्यांचा कडकडाट केला
जिजाऊ जन्मोत्सव निमित्त बुलढाणा शहरातील जयसम चौक परिसरात राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ ची सर्वात उंच प्रतिमा स्थापन करण्यात आली आहे या ठिकाणी दोन दिवसात पासूनच रंगरंगोटी व साफसफाई ची कामे करण्यात आले रात्री रंगीत रोषणाई करण्यात आल्याने हा परिसर मनमोहक व आकर्षक असा दिसून येत होता त्यामुळे सर्व शहराचे लक्ष सदर महाआर तिकडे लागले होते आरती सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान होणार असल्याची माहिती नागरिकांना असल्याने सकाळपासूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती.



