बातमी

ईव्हीएम मशीन ऐवजी मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याच्या प्रक्रियेला वेळ वाढवावा * वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे यांची मागणी

 ईव्हीएम मशीन ऐवजी मत पत्रिकेद्वारे मतदान घेण्यात यावे याकरीता ३१ जानेवारी २०२४ पर्यंत वाढीव वेळ मिळावी ( राजपत्र अधिसूचना क्र २११ नुसार) याकरिता वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे यांनी मागणी करत ९ जानेवारी रोजी निवेदन सादर केले आहे. उच्चस्तरीय समिती व नेशन वन इलेक्शन नवी दिल्ली सचिव यांना पाठविलेल्या  निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.
        निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, आपल्या कार्यालयीन शासकीय सार्वजनिक नोटीस २ डिसेंबर २०२३ रोजीच्या अधिसूचनेप्रमाणे संदर्भात शर्ती व अनुसार समिती स्थापन उच्च न्यायालयीन प्रशासकीय रुपरेषा निर्माण संविधान संबंधीत निवडणुक कायद्या अंतर्गत आपण इंग्रजी वृत्तपत्रामध्ये दिलेली सार्वजनिक नोटीस त्यामध्ये भारतीय नागरिकांना केलेल्या आवाहनानुसार मत पत्रिकेद्वारे मतदान घेण्याचा पत्र व्यवहार करण्याची तारिख ही १५ जानेवारी २०२४ अत्यंत अल्प वेळ असून महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचली नाही व ती स्थानिक भाषेत नसल्यामुळे ग्रामीण भागातील ९० टक्के जनतेपर्यंत पोहचली नाही. नागरिकांमध्ये संभ्रम आहे. तसेच भारतीय नागरिकांच्या हक्कांचे वेळे अभावी मत जाणून घेण्यास पारदर्शियता निर्माण व्हावी या उद्देशाने संपूर्ण भारत देशामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या माध्यमातून स्थानिक वृत्तपत्रात प्रकाशीत करण्यात यावी जेणेकरून नागरिकांना आपले मत मांडता येईल व संविधानाने दिलेल्या अधिकाराचे पूर्णपणे पालन होईल असेही वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

      सदर निवेदनाच्या प्रती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.बाळासाहेब आंबेडकर, प्रा.अंजलीताई आबेडकर, बहुजन आघाडी प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांना पाठविण्यात आल्या आहेत.
Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button