बातमी

उद्या बुलढाण्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या युवक मेळाव्याचे आयोजन

मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे मनिष बोरकर यांचे आवाहन

उद्या बुलढाण्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या युवक मेळाव्याचे आयोजन

 मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे मनिष बोरकर यांचे आवाहन

बुलढाणा :
जिल्ह्यात सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीने दमदार कामगिरी केली. १ पैकी १ अशा १०० टक्के स्ट्राइक रेटने जबरदस्त इनिंग झाल्यानंतर आता पक्षबांधणीवर जोर देण्यात येत आहे. त्याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून भव्य सभासद नोंदणी अभियानाचा शुभारंभ व युवक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या दिनांक ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता गर्दे वाचनालय बुलढाणा येथे युवक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे, जिल्हाध्यक्ष डॉ. नाझेर काझी, तुकाराम अंभोरे प्रदेश उपाध्यक्ष, इरफान अली प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच नेते उपस्थित राहणार आहेत. संघटन बांधणी आणि युवक जागर या उद्देशाने आयोजित या मेळाव्यात पक्षाच्या भविष्यातील दिशेचा वेध घेतला जाणार आहे. पक्षविरोधी कारवाई करणाऱ्यांना त्यांच्या शैलीत उत्तर देण्याचा संकल्पही या मेळाव्यात केला जाणार असल्याची माहिती युवक जिल्हाध्यक्ष मनीष बोरकर यांनी दिली आहे. अजितदादांनी नेहमीच युवकांवर विश्वास दाखवला आहे, पक्षात युवकांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. त्यामुळे युवकांनी मोठ्या संख्येने या मेळाव्यात सहभागी व्हावे असे आवाहनही युवक जिल्हाध्यक्ष मनीष बोरकर यांनी केले आहे.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button