बातमी

उपोषणाचा इशारा देताच मिळाले लेखी अस्वांसन . अम्रपाल वाघमारे*

*उपोषणाचा इशारा देताच मिळाले लेखी अस्वांसन . अम्रपाल वाघमारे*

 

 

मेहकर :- मेहकर तालुक्यातील पार्डा येथील शासकीय जमीन कसनाऱ्या शेतकऱ्यांचा गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांबाबत अनेक वेळा अर्ज निवेदन ,विनंती करूण ही महसूल प्रशानाची झोप उघडत नव्हती ,परंतु या सुस्त निद्रांस्त असलेल्या मेहकर महसूल प्रशासनाला भारतीय समता संघटनेच्या वतीने अमरण उपोषणाचा इशारा देताच मेहकर तहसीलदार यांनी लेखी पत्र देऊन उपोषणाल न बसन्याची विनंती केली आहे .यावेळी संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक माझी जि.प. सदस्य .मा नरहरी दादा गवई यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली अमरण उपोषणाची घोषणा करण्यात आली होती . पार्डा येथील शासकीय जमीन कसनाऱ्या शेतकऱ्यांचा प्रश्न कायम निकाली काढण्यासाठी अमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला होता .पार्डा येथील गायरान जमीन कसनारे शेतकरी हे अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील असल्यामुळे त्यांना कोणतेही उपजिवेकेचे साधन नसल्यामुळे आम्ही पोटाची खळगी भरण्यासाठी या शासनाच्या विनावापर जमीनी स्वता अंगमेहनतीने हाडाचे काड करूण लागवडी खाली आनल्या आसून याच जमीनीच्या भरोशावर परीवाराचा उदारनिर्वाह चालू आहे .या वितीरिक्त अर्जदार यांच्याकडे कोणतेही उपजिवेकेचे साधन नाही .तरी भारतीय संविधानाने आर्टिकल 39(क,) प्रमाने गरजेचे साधनं पुरवण्याची जबाबदारी ही सरकारची आहे .तरी सरकार आमची गोरगरीब जनतेची दिशाभूल करूण आम्हाला आर्थिक दुर्बलतेकडे नेत असल्याचं मत भारतीय समता संघटनेचे अध्यक्ष मा . अम्रपाल भाऊ वाघमारे यांनी बोलताने व्यक्त केले आहे . मेहकर तालुक्यातील कोणतेही गायरान जमीनीवरील कब्जा ,व घरासाठी असलेला रहीवास कोणालाही हटवता येणार नाही .असे बेकायदेशीर कृत्य केल्यास आम्ही संघटनेच्या वतीने आपेक्षाही तिव्र आंदोलन छेडू असा ईशारा आम्रपाल भाऊ वाघमारे यांनी दिला आहे .यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष वसूदेव निकाळजे, कार्याध्यक्ष शुद्धोधन गवई , भिमराव काकडे ,ता अध्यक्ष विनोद जाधव ,पी .के. शेजोळ ,राजहंस पनाड , व पार्डा येथील सर्वच शासकीय जमीन कसनारे शेतकरी हजर होते ..

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button