बातमी
ऑगस्ट रोजी वृत्त गौरव पुरस्काराचे वितरण

ऑगस्ट रोजी वृत्त गौरव पुरस्काराचे वितरण
बुलडाणा
समाजाभिमुख पत्रकारितेची दाखल घेत बुलडाणा येथील मानस फाउंडेशन द्वारा सन 2024 साठी वृत्तगौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन 9 ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता पत्रकार भवन बुलढाणा या ठिकाणी करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. वसंतराव चिंचोले संस्थापक अध्यक्ष शिवसाई पतसंस्था बुलढाणा हे राहणार असून पुरस्काराचे वितरण कुलदीप जंगम मुख्य कार्यकारी अधिकारी बुलढाणा, सुनील कडासने जिल्हा पोलीस अधीक्षक, राधेश्याम चांडक भाईजी, सर्वसर्व बुलढाणा अर्बन यांच्या हस्ते होणार आहे. तर प्रमुख उपस्थिती म्हणून अनिल म्हस्के राज्य अध्यक्ष व्हाईस ऑफ मीडिया, राजेंद्र काळे उपाध्यक्ष मराठी पत्रकार परिषद, पत्रकार राजेश देशमाने ,सामाजिक कार्यकर्ते अमोल रिंढे हे राहणार आहे.
वृत्त गौरव पुरस्कारार्थी रणजीतसिंग राजपूत संपादक गुड इव्हीनिंग सिटी, संदीप वानखेडे जिल्हा प्रतिनिधी पुढारी न्युज चॅनल, कैलास राऊत संपादक दैनिक बातमी जगत, शौकत शाह संपादक दैनिक एशिया मंच यांना सन्मानित केले जाणार आहे . तरी या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ता, पत्रकार बांधव याण्यासह नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मानस फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष डी.एस. लहाने, उपाध्यक्ष पत्रकार गणेश निकम, प्रा.शाहिनाताई पठाण यांनी केले आहे.



