बातमी

काँग्रेस नेते संदीप शेळके यांचा आज पासून जिल्हा संवाद दौरा * मोताळ्यापासून होणार सुरुवात

काँग्रेस नेते संदीप शेळके यांचा आज पासून जिल्हा संवाद दौरा

* मोताळ्यापासून होणार सुरुवात
बुलढाणा 
         सदैव ओपनिंगला फटकेबाजी करणारे काँग्रेस नेते तथा राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष आणि वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांच्या २४ व २५ मार्च दोन दिवसीय तालुकानिहाय संवाद दौऱ्याला  आज पासून प्रारंभ होणार आहे. काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यासोबत ते संवाद साधणार आहेत. पक्षीय संघटन आणि घ्येयधोरणे यानुषंगाने हा दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे. 
 
           प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या मार्गदर्शनात हा संवाद दौऱ्याची आखणी करण्यात आली आहे. मोताळा तालुक्याची बैठक २४ मार्च रोजी विठ्ठल – रुख्मिणी मंदिर, वाघजाळ येथे सकाळी ९ वाजता होणार आहे. मलकापूर येथे सकाळी १०.३० वाजता, नांदुरा ११.३० वाजता काँग्रेस कमिटी कार्यालयात बैठक होईल. खामगाव येथे दुपारी १ वाजता नगर परिषद जवळ बैठकीचे आयोजन केले आहे. शेगावात दुपारी २ वाजता बैठक होणार आहे. संग्रामपूर तालुक्यातील बैठक शिक्षक सोसायटी, कॉटन मार्केट जवळ, वरवट बकाल येथे दुपारी ३.३० वाजता होईल. जळगाव जामोद येथे दुपारी ४.३० वाजता कॉ. कमिटी कार्यालय येथे बैठक होणार आहे.
 
         घाटावरील तालुक्यांची बैठक २५ मार्च रोजी मेहकर येथे सकाळी १०.०० वाजता होणार आहे. लोणार येथे सकाळी ११.३० वाजता, सिं. राजा येथे दुपारी १.०० वाजता, दे. राजा येथे दु. २.०० वाजता तर चिखलीत दुपारी ३.३० वाजता बैठक होणार आहे. संबंधित तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संवाद साधण्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन संदीप शेळके यांनी केले आहे.
Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button