बातमी

कुख्यात वाळू चोरट्याचे महसूल विभागाने सिनेस्टाईल पकडले टिप्पर*.

*कुख्यात वाळू चोरट्याचे महसूल विभागाने सिनेस्टाईल पकडले टिप्पर*….

मलकापूर: गेल्या अनेक दिवसापासून मलकापूर नजीक असलेल्या पूर्णा माय नदीपात्रात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खनन व वाहतूक होत असल्याची माहिती महसूल विभागाला सूत्रांकडून मिळाली. या अनुषंगाने तहसीलदार राहुल तायडे यांच्या आदेशान्वये तलाठी मनोज एदलाबादकर यांनी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यासह विना नंबर व अवैध रेतीने भरलेल्या टिप्परला सिनेस्टाईल पाठलाग करून अखेर काळेगाव-हरसोडा रोडवर धरदबोचले.

याबाबत सविस्तर असे की, पूर्णामाई नदीपात्रात
महसूल प्रशासनाकडून वाळू तस्करी थांबविण्यासाठी निरंतर कारवाया सुरूच आहेत. तरीसुद्धा वाळूमाफिया प्रशासनाची नजर चुकवून अवैध वाळू उपसा व वाहतूक करीतच होते.या वाळू माफियांना दणका देण्यासाठी अधिकारीही डोळ्यात तेल घालून रात्रंदिवस टिपून होते. तहसीलदार राहुल तायडे यांना अवैध रेती वाहतूक करणारे एका विना नंबर टिप्पर ची माहिती आज दिनांक 29 जानेवारी 2025 रोजी मिळाली. त्या अनुषंगाने सकाळपासूनच नरवेल,कोटेश्वर, हरसोडा, काळेगाव,सावरगाव या परिसरात तहसीलदार यांच्या आदेशान्वये महसूल विभागाची एक टीम कर्तव्यावर होती. मिळालेल्या माहितीप्रमाणे विना नंबर चे एक टिप्पर ज्यावर प्रथम दर्शनी भागात ‘विठ्ठले’ व पाठीमागील भागात ‘रावडी’ असे लिहिले होते. सदर टिप्पर चालकाने महसूल विभागाची गाडी पाहताच टिप्पर सुसाट वेगाने पळवले. पुढे सदर टिप्पर व त्या पाठीमागे महसूल विभागाची गाडी असा सिनेस्टाईल पाठलाग सुरू होता. अखेर महसूल कर्मचाऱ्यांकडून सदर टिप्पर अडविले व चालकाची चौकशी केली असता सुरुवातीला चालकाने उडवाउडवीचे उत्तर दिले व टिप्पर घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला व नंतर सदर टिप्पर मालक ‘मुन्ना राठोड’ असल्याचे सांगितले. त्यानंतर महसूल कर्मचाऱ्यांनी सदर टिप्पर मलकापूर उपविभागीय कार्यालयाच्या प्रांगणात लावण्यात येऊन कारवाई, पंचनामा प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
सदरची कारवाई तहसीलदार मा राहुल तायडे साहेब यांच्या आदेशान्वये तलाठी मनोज एदलाबादकर साहेब, शिपाई सचिन गिरी, काळेगावचे पोलीस पाटील, वाहन चालक दिलीप तायडे या धाडसी टीम कडून करण्यात आली आहे.

 

*जिल्हाधिकारी यांचे कडून कडक आदेश.*

जिल्ह्यात एकही अधिकृत वाळू डेपो नसताना मलकापूर तालुक्यातील पूर्णा नदीतून हजारो ब्रास वाळूचा अवैध उपसा केला जात आहे. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी सर्व अधिनस्त अधिकाऱ्यांना वाळू तस्करी थांबविण्याचे आदेश जारी केलेले आहे. त्यानुसार मलकापूर तहसीलदार राहुल तायडे यांच्याकडून कर्तव्याचे पालन.

मौजे काळेगाव येथे अवैध रेती वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून मा राहुल तायडे तहसीलदार साहेब यांच्या आदेशान्वये काळेगाव येथे पोहोचलो असता रेतीने भरलेले टिप्पर आढळून आले. पुढील दंडात्मक कारवाईसाठी सदर टिप्पर मलकापूर तहसील कार्यालय प्रांगणात जप्त करण्यात आले व पंचनामा करण्यात आला. सदर टिप्पर विना नंबरचे असून चालकाने दिलेल्या माहितीनुसार मुन्ना राठोड असे मालकाचे नाव आहे.

 

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button