बातमी

कु. सिद्धी डिडोळकर हिची शालेय  सायकलिंग स्पर्धेत राज्यस्तरावर निवड

कु. सिद्धी डिडोळकर हिची शालेय
सायकलिंग स्पर्धेत राज्यस्तरावर निवड
बुलढाणा, दि 15 (जिल्हा प्रतिनिधी)  —
        रामरक्षा इंग्लिश स्कूल पाडळी ता. जि. बुलढाणा येथील कु. सिद्धी राजेश डिडोळकर ही अमरावती विभागीय शालेय सायकलींग स्पर्धेमध्ये विभागात द्वितीय आली असून तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
            महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व अमरावती जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावती येथे सोमवार दिनांक 14 ऑक्टोंबर रोजी घेण्यात आलेल्या अमरावती विभागीय सायकलींग स्पर्धेत बुलढाणा जिल्ह्यातील पाडळी येथील रामरक्षा इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी कु. सिद्धी राजेश डिडोळकर हिने 19 वर्षे वयोगटातील शालेय सायकलिंग स्पर्धेत मास ट्रायल या क्रीडा प्रकारात अमरावती विभागात द्वितीय आली आहे. तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ती आपल्या यशाचे श्रेय शाळेचे संचालक प्राचार्य क्रीडा शिक्षक व आपले वडील राजेश डिडोळकर यांना देते.
Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button