बातमी

कृषी सहाय्यकांच्या समस्यांचा शासन स्तरावर पाठपुरावा करणार -शिवसेना आमदार सिध्दार्थ खरात

*कृषी सहाय्यकांच्या समस्यांचा शासन स्तरावर पाठपुरावा करणार -शिवसेना आमदार सिध्दार्थ खरात*

 

मेहकर दि ७

कृषी विभागाच्या होऊ घातलेल्या आकृतीबंधमध्ये कृषी सहाय्यक यांच्या पदोन्नतीचा गुंता दूर करण्यात यावा, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेने मेहकर तालुका कृषी अधिकारी कार्यालया समोर तीव्र आंदोलन सुरु केले आहे या आंदोलनाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी आज बुधवार दि.७ मे २०२५ रोजी भेट देऊन कृषी सहाय्यकांच्या समस्या जाणून घेतल्या असून सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.#या वेळी शिवसेना तालुका प्रमुख निंबाजी पांडव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष दत्ता घनवट, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय वडतकर, शहर प्रमुख किशोर गारोळे, ॲड संदीप गवई, गणेश सवडतकर आदी उपस्थित होते, सदर आंदोलन हे विविध टप्प्यात करण्यात येत आहे. दरम्यान आंदोलकांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकार्‍यांना निवेदन देत मागण्या मान्य न झाल्यास १५ मे पासून कामबंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
सध्या कृषी विभागात आकृतीबंध तयार करण्यात येत आहे. यामध्ये कृषी सहाय्यक यांच्या पदोन्नतीबाबत अडचणी आहे. त्यामुळे संघटनेला विश्वासात घेऊन आकृतीबंध मंजूर करावा.
आकृतीबंधमध्ये कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक यांचे प्रमाण ४:१ याप्रमाणे करण्यात यावे, कृषी सहाय्यक संवर्गाचे पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करण्यात यावे, कृषीसेवक कालावधी रद्द करून कृषी सेवकांना नियमित कृषी सहाय्यक पदाचे आदेश देण्यात यावे, कृषी विभागामध्ये वाढत्या ऑनलाइन कामाचा व्याप लक्षात घेता कृषी सहाय्यकांना लॅपटॉप उपलब्ध करून द्यावे, कृषी सहाय्यकांना कायमस्वरूपी मदतनीस मिळावी, पोखरासारख्या महत्त्वाकांक्षी योजनेमध्ये कृषी सहाय्यक यांच्या मदतीला समूह सहाय्यक नियुक्त करावे, कृषी निविष्ठा वाटपामध्ये सुसूत्रता आणावी आदी विविध मागण्याचे निवेदन आमदार सिद्धार्थ खरात यांना देण्यात आले आहे.सदर निवेदनावर विलास रिंढे,महेंद्र गजभिये यांच्यासह अनेकांच्या सुह्या आहेत.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button