राजकीय बातमी
केंद्रीय अर्थसंकल्प 2026 हा सर्वसामान्य जनतेसाठी नाही… जयश्री शेळके
हा अर्थसंकल्प ‘कॉर्पोरेट साथ, कॉर्पोरेट विकास’चा या जनविरोधी अर्थसंकल्पाचा जाहीर निषेध! शिवसेना प्रवक्ता जयश्री शेळके

केंद्रीय अर्थसंकल्प 2026 हा सर्वसामान्य जनतेसाठी नाही, तर काही मोजक्या उद्योगपतींसाठी तयार करण्यात आलेला अर्थसंकल्प आहे. महागाई, बेरोजगारी, शेतमालाला मिळणारा कमी दर, शिक्षण व आरोग्य व्यवस्थेतील ढासळती स्थिती यासारख्या ज्वलंत प्रश्नांवर या अर्थसंकल्पात ठोस उपाययोजना नाहीत. पेट्रोल, डिझेल, गॅस आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीमुळे सामान्य नागरिक आधीच त्रस्त असताना, त्यांना कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही.
शेतकऱ्यांसाठी केवळ घोषणांचा पाऊस असून, कर्जमाफी, हमीभाव, उत्पादन खर्चावर आधारित दर याबाबत ठोस तरतूद दिसत नाही.
रोजगारनिर्मितीबाबत केवळ पोकळ आश्वासने आहेत. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राला पुरेसा निधी न देता सरकार खासगीकरणाला चालना देत आहे.
हा अर्थसंकल्प ‘कॉर्पोरेट साथ, कॉर्पोरेट विकास’चा या जनविरोधी अर्थसंकल्पाचा जाहीर निषेध!



