बातमी

केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचा जनता दरबार …! मेहकर येथील शिवसेना जनसंपर्क कार्यालयातुन केला ऑन द स्पॉट निपटारा …!!

केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचा जनता दरबार …! मेहकर येथील शिवसेना जनसंपर्क कार्यालयातुन केला ऑन द स्पॉट निपटारा …!!

बुलडाणा ( प्रतिनिधी )

केंद्रीय आयुष व आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी आज मेहकर येथील शिवसेना जनसंपर्क कार्यालयात बसून जनतेच्या तक्रारी समस्यां जाणून घेत ऑन द स्पॉट निपटारा केला ….

केंद्रीयमंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव आज 1 जुन रोजी गावी असतांना त्यांनी मेहकर येथील शिवसेना संपर्क कार्यालयात बसून नागरिकांच्या तक्रारी समस्या आणि अडचणी व इतर समस्या जाणून घेतल्या त्याचवेळी त्यांनी संबंधित यंत्रणेला दूरध्वनी वरून संपर्क साधून तक्रारींचे आणि समस्यांचे तात्काळ निराकरण केले तसेच विविध विकासात्मक कामासंदर्भात ही नागरिकांच्या सोबत चर्चा केली आगामी काळामध्ये सर्वांना सोबत घेऊन विकासात्मक बाबींवर चर्चाही केली .. बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील नागरिकिरांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण सदैव तत्पर असल्याचे केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी दाखवून दिले . त्यामुळे मेहकर येथील शिवसेना संपर्क कार्यालयाला जनता दरबाराचे स्वरूप प्राप्त झाले होते .

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button