केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री डॅा.रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त बुलडाण्यात विविध कार्यक्रम संपन्न…

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री डॅा.रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त बुलडाण्यात विविध कार्यक्रम संपन्न…

बुलडाणा,(प्रतिनिधी)- केंद्रीय सामाजिक न्याय राजमंत्री भारत सरकार डॅा.रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हा संपर्क प्रमुख पत्रकार बाबासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनात फळ वाटप व विविध कार्यक्रम घेऊन उत्साहात पक्षाचे नेते तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा वाढदिवस ” संघर्ष दिन ” म्हणून साजरा करण्यात आला
महायुतीतील घटक पक्ष असलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा आज वाढदिवस बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक तालुका स्तरावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करून हा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे संपर्कप्रमुख बाबासाहेब जाधव यांच्या पुढाकाराने बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भाजपा बुलडाणा तालुका डॉ. राजेश्वर उबरांडे, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाच्या जिल्हा महीलाध्यक्षा अनुजाताई साळवे, भाजपा तालुकाध्यक्ष वर्षाताई पाथरकर, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष तथा भाजपा जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत बरदे, रिपाई महीला उपाध्यक्ष आशाताई वानरखडे, शाहीर डी.आर. इंगळे, रिपाइं बुलडाणा तालुकाध्यक्ष केशव सरकटे, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष नबाब मिर्झा, युवाध्यक्ष जिल्हाध्यक्ष विजय साबळे, मोताळा तालुकाध्यक्ष बाळासाहेब अहिरे, महीला बुलडाणा तालुकाध्यक्ष उषाताई इंगळे, डिगांबर गवई, विद्याधर, सविता शिंदे,मीना खरे,रूपाली कांबळे यांच्यासह भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस,व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



