आरोग्य बातमी

कैरो इजिप्त येथील आंतरराष्ट्रीय परिषद साठी मूळव्याध तज्ञ डॉ गोपाल लोखंडे यांच्या शोध प्रबंधाची निवड.

कैरो इजिप्त येथील आंतरराष्ट्रीय परिषद साठी मूळव्याध तज्ञ डॉ गोपाल लोखंडे यांच्या शोध प्रबंधाची निवड.

19th Annual meeting of the Mediterranean Society of Pelvic Floor Disorder (MSPFD) & Egyptian Society of Colon and Rectum (ESCR) यांनी आयोजित केलेल्या व इजिप्त शहरातील कैरो इथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषद मध्ये चिखली येथील सुप्रसिद्ध मुळव्याध तज्ञ डॉ गोपाल लोखंडे यांचा मूळव्याध वरील शोध प्रबंधाची निवड करण्यात आलेली आहे.
सदर परिषद ही इजिप्त देशातील कैरो या शहरांमध्ये 10 ते 12एप्रिल 2025 अशी तीन दिवस चालणार आहे. यामध्ये जगभरातून तज्ञ डॉक्टर्स आपला सहभाग नोंदवणार आहे.
चिखली सारख्या छोट्या शहरांमध्ये यशोदीप मुळव्याध हॉस्पिटल च्या माध्यमातून डॉ गोपाल लोखंडे हे मागील 24 वर्षापासून आपली सेवा देत आहे. रेडिओ फ्रिक्वेन्सी व लेझर यासारख्या अत्याधुनिक पद्धतीचा वापर ते मागील अनेक वर्षापासून आपल्या रुग्णांच्या उपचारासाठी करत आहे. हजारो रुग्ण या पद्धतीने आतापर्यंत त्यांनी मूळव्याध मुक्त केलेले आहेत.
मुळव्याध उपचारांमध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी व लेझरची उपयुक्तता याविषयी त्यांनी आपला शोध प्रबंध सदर परिषदेला पाठविला होता. त्याची निवड परिषदेतील तज्ञ मंडळी कडून करण्यात आलेली आहे.
आपला शोध प्रबंध सादर करण्यासाठी डॉ गोपाल लोखंडे हे 10 एप्रिल रोजी कैरो इजिप्त यासाठी जाणार आहे.
यासाठी समाजातील सर्व स्तरातून त्यांचेवर अभिनंदन व शुभेच्छा चा वर्षाव होत आहे.
यापूर्वी देखील डॉ गोपाल लोखंडे यांनी अनेक राष्ट्रीय व दुबई येथील आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सहभाग नोंदवून आपल्या कार्याचा ठसा उमटवला होता.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button