कोट्यवधींची विकास कामे आ. संजय गायकवाडांसाठी ठरणार विजयाचा मार्ग

कोट्यवधींची विकास कामे आ. संजय गायकवाडांसाठी ठरणार विजयाचा मार्ग
बुलढाणा : महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार संजय गायकवाड यांच्यासाठी त्यांनी अल्प कालावधीत केलेली विकासकामे हीच त्यांच्या विजयाचा मार्ग या निवडणुकीत ठरणार असल्याचे दिसून येते. राज्यातील सत्ता बदलानंतर गायकवाड यांना मतदार संघात काम करण्यासाठी अत्यंत कमी कालावधी मिळाला. या कालावधीत त्यांनी बुलढाणा मतदार संघाचा कायापालट घडवून आणण्यासाठी हजारो कोटीची कामे मतदार संघात आणली. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या बुलढाणा शहरात विविध जाती धर्माच्या महापुरूषांचे पुतळे व स्मारके उभारली. शहराचे सौंदर्यीकरण घडवून आणले. विकासकामांसाठी त्यांनी दाखविलेलेला आक्रमक बाणा मतदार संधातील जनतेला आकर्षीत करून गेला आहे. मतदार संघातील गोरगरीब होतकरू विद्यार्थ्याासाठी मेडीकल कॉलेज मंजूर करून आणले. याशिवाय कृषी विद्यापिठाच्या उपकेंद्रालाही मंजूरात आणल्याने बुलढाणा मतदार संघातील जनतेला त्यांच्या नेतृत्वाची खात्री पटली आहे. त्यामुळे त्यांच्या विजयाची हमी जनता घेताना दिसत आहे. कुठेही अन्याय झाल्यास धावून जाण्याचा त्यांचा स्वभाव मतदार संघातील जनतेच्या सुरक्षेसाठी अनुकूल आहे. त्यांनी मतदार संघाचा विकासात्मक कायापालट घडवून आणण्यासाठी केलेले प्रयत्न त्यांना या विधानसभा निवडणुकीतील विजयासाठी पूरक ठरणार असल्याचे दिसते त्यांच्या विकासकामांच्या बळावर त्यांचा विजय सुनिश्चीत मानला जात आहे.



