कोरडा दिवस पाळा.. नगर परिषदेचे शहरात जनजागृती सुरू

कोरडा दिवस पाळा.. नगर परिषदेचे शहरात जनजागृती सुरू

बुलडाणा:-
मागील काही दिवसात बुलढाणा शहरात डेंग्यूचे रुग्ण आढळले होते. त्याची रोखथाम करण्यासाठी बुलढाणा नगर परिषदेने शहरात जनजागृती पर कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यात कीटकनाशकांची फवारणी करत जनतेत जनजागृती सुद्धा केली जात आहे
राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत किटकामार्फत विशेषता: डासांमार्फत प्रसारित होणारे हिवताप डेंग्यू चिकनगुनिया हत्तीरोग जैई अशा रोगांच्या नियंत्रणासाठी नियमित कार्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात येते या रोगावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने सर्व स्तरावर नागरिकांचे सहकार्य अपेक्षित असल्याने जनतेत जनजागृती ला सुरुवात करण्यात आली आहे.
जेणेकरून या रोगांवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवणे शक्य होईल.
*रोगप्रसारक डास व त्यांची उत्पत्ती*
डासांच्या जीवन क्रमामध्ये चार अवस्था ( अंडी,अळी, कोष व प्रौढ डास ) असून तीन अवस्था पाण्यातील आहे या तीनही अवस्था सहज नष्ट करता येतात त्यामुळे डासांची उत्पत्ती रोखता येईल.
साधारणपणे मादी डास एका वेळेला 150 ते 250 अंडी घालते अशा प्रकारे तिच्या संपूर्ण आयुष्यात चार ते पाच वेळा ती अंडी घालते त्यामुळे दास उत्पत्तीचा वेग किती भयंकर आहे हे आपल्याला लक्षात येईल.
डेंग्यूचा प्रसार एडिस एजिप्तया या जातीच्या डासापासून होतो व त्याची उत्पत्ती स्वच्छ पाण्यात होते उदाहरणार्थ घरातील पाणीसाठे हौद माठ रांजण रिकामी टायर्स नारळाच्या करवंड्या भंगार सामान कुलर फुलदाणी कारंजे इत्यादी
*रोग लक्षणे*
डेंगू तीव्र स्वरूपाचा ताप, अंगदुखी, मळमळ डोक्याच्या खोबणी मध्ये दुखणे अंगावर पुरळ येणे कानातून नाकातून हिरड्यातून रक्तस्त्राव होणे इत्यादी
*प्रतिबंधात्मक उपाय योजना*
वैयक्तिक व परिसराची स्वच्छता ठेवावी
घरात व परिसरात दासोपती स्थानी असल्यास नष्ट करावी
आठवड्यात एक दिवस कोरडा दिवस पाळावा
पाणी साठ हे घट्ट झाकून ठेवावे
उन्हाळ्यात वापरलेले कुलर स्वच्छ करून कोरडे करावे
घरातील अडगळीच्या वस्तू उदाहरणार्थ भंगार सामान तुटलेले खेळणी टायर्स फुटलेल्या बाटल्या जुनी माठ रांजण नष्ट करावीत
झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा
लहान मुलांनी व घरातील इतर सर्वांनी अंगभर कपडे घालावेत
डास पळवणाऱ्या अगरबत्ती क्रीम चा वापर करावा
खिडक्यांना डासरोधक जाळी बसवा
परिसरात डबकी असल्यास ती बुजवण्यात यावी बुजवणे शक्य नसल्यास त्यावर जळालेले ऑइल तेल वंगण टाकावे किंवा गप्पी मासे सोडावे
ताप आल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा
ताप असेपर्यंत आराम करावा ताप कमी होण्यासाठी पॅरासिटामोल गोळ्यांचा वापर करावा
ताप अथवा वेदनाशामक म्हणून अस्प्रीन अथवा आयबुप्रोफेन गोळ्या घेऊ नये
निर्जलीकरण होऊ नये म्हणून जलस्त्रोताचा भरपूर उपयोग करा
असे आवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासक नगरपरिषद बुलढाणा यांना केले आहे



