क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी पत्रकार निलेश राऊत बिनविरोध निवड

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी पत्रकार निलेश राऊत बिनविरोध निवड…
बुलढाणा महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी निलेश राऊत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली यावेळी 2024 चे माजी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष राहुल कासारे यांनी प्रातावीका मध्ये मागील वर्षी च्या कार्यक्रम ची माहिती दिली. 2025 ची जयंती मोठ्या थाटामाटात व उत्साहात साजरी व्हावी अशी अपेक्षा देखील यावेळी व्यक्त केली यावेळी समाज भूषण दिलीपभाऊ जाधव, राजेंद्र काळे,आशिषबाब खरात,अशोक दाभाडे,बलाभाऊ राऊत,कुणाल पैठणकर,अमोल खरे,गजानन सुरडकर,पत्रकार दीपक मोरे, सुनील मोरे वैशालिताई ठाकरे,यांच्या सह बौद्ध उपासक उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सूत्रसंचालन विनोद इंगळे यांनी केले तर आभार प्रदर्शन अमोल खारे यांनी मानले