क्राईम बातमी
गाय चोरीच्या संशयावरून तरुणास बेदम मारहाण…
मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर ॲट्रॉसिटीसह अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याची जखमी तरुणाची मागणी...

गाय चोरीच्या संशयावरून तरुणास बेदम मारहाण…
मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर ॲट्रॉसिटीसह अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याची जखमी तरुणाची मागणी…
बुलढाण्याच्या मिलिटरी प्लॉटमध्ये मोलमजुरी करणाऱ्या 22 वर्षीय प्रथमेश गवई या तरुणावर गाय चोरीचा संशय घेत बुलढाण्यातीलच श्रीकांत गायकवाड यांनी लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे, ज्यामध्ये प्रथमेश गवई हा गंभीरित्या जखमी झाला आहे, आणि उलट जखमी झालेल्या तरुणावरच चोरीचा खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप संबंधित तरुणाने केला आहे, बेदम मारहाण करणाऱ्या श्रीकांत गायकवाड यांच्यावर ऍट्रॉसिटीसह अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी जखमी तरुणासह त्याच्या नातेवाईकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे…



