बातमी

गुरुजनांच्या ऋणातून बुलढाणेकर होणार उतराई… शिक्षकदिनी नामवंत शिक्षकांचा सन्मान सोहळा!

गुरुजनांच्या ऋणातून बुलढाणेकर होणार उतराई…

शिक्षकदिनी नामवंत शिक्षकांचा सन्मान सोहळा!

बुलढाणा

सुसंस्कृतपिढ्या घडविण्याचे काम करतात ते शिक्षक… काही शिक्षकांनी तर विद्यादानाच्या पलीकडे जाऊन सामाजिक कार्यालाही विशेष प्राधान्य दिले आहे. समाजासाठी कायम आदरणीय असणाऱ्या गुरुजनांच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न जिजामाता महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटनेकडून आयोजित केला आहे.शिक्षकदिनाच औचित्य साधून बुलढाण्यात गुरुजनांचा सन्मान सोहळा पार पडत आहे.

बुलढाणा शहराला नेहमीच नवा विचार देणाऱ्यांमध्ये प्रा. सुनील सपकाळ हे नाव आदराने घेतले जाते. बुलढाण्यातील सार्वजनिक शिवजयंती उत्सव सोहळा राज्यभर दखलपात्र करणाऱ्या नावांमध्ये सुनील सपकाळ हे नाव वर येते. त्यांच्याच संकल्पनेतून गुरुजनांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. काही शिक्षकांनी आपापल्या शाळा राज्यभर दखल घ्यावी अशा केल्या आहे तर काहींनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये विद्यार्थी उच्च पदावर पोहोचवण्याची किमया देखील करून दाखवली आहे. शिक्षक आपापल्या कामांमध्ये मेहनत घेतात तेव्हा कुठे त्याचे सकारात्मक परिणाम समाजावर दिसत असतात. अशा शिक्षकांची दखल घेऊन त्यांचा सन्मान करणे सामाजिक ऋण व्यक्त करण्यासारखेच आहे. याच भावनेतून प्रा सुनील सपकाळ अध्यक्ष माजी विद्यार्थी संघटना जिजामाता महाविद्यालय बुलढाणा यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन शिक्षक दिनी पाच सप्टेंबर रोजी जनशिक्षण संस्था येथे केले आहे.कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आमदार धीरज लिंगाडे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या राज्यप्रवक्त्या जयश्रीताई शेळके ,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब भोंडे, शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत ,नरेश शेळके यांच्यासह विविध क्षेत्रातील नामवंत मंडळी उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक सुनील सपकाळ यांनी केले आहे.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button