बातमी

गुरुवारी लोकशाहीर वामनदादा कर्डक अभिवादन सोहळ्याचे आयोजन

गुरुवारी लोकशाहीर वामनदादा कर्डक अभिवादन सोहळ्याचे आयोजन

बुलडाणा : महाकवी डॉ. वामनदादा कर्डक यांच्या २१ व्या स्मुर्ती दिनानिमित्त बुलडाणा येथील एडेड हायस्कूल समोरील वामनदादा कर्डक स्मृती स्थळावर १५ मे गुरुवार रोजी वामन दादा कर्डक प्रतिष्ठानच्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन केले आहे. आमदार धर्मवीर संजय गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली होनाऱ्या या कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत आपल्या ओजस्वी कविता आणि गीतांद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घराघरात पोहोचवणारे लोकशाहीर डॉ. वामनदादा कर्डक हे खऱ्या अर्थाने लोककवी आणि समाजप्रबोधनकार होते. आपल्या हयातिभर त्यांनी आपल्या लेखणी व गायनातून बुद्ध, फुले, शाहू आणि आंबेडकरी विचारांचा प्रसार केला. त्यांच्या १०,००० हून अधिक गीतांनी, विशेषत: आंबेडकरी जलशांमधील सादरीकरणांनी, समाजात क्रांतिज्योत प्रज्वलित ठेवली.”सांगा धनाचा साठा, आमचा वाटा कुठाय हो?” अशा त्वेषपूर्ण शब्दांत त्यांनी विषम व्यवस्थेला आव्हान दिले. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात (२०२१-२२) त्यांचे कार्य स्मरण करत, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह अनेक संस्थांनी ‘गीत वामनाचे’ या सारख्या कार्यक्रमांतून त्यांना आदरांजली वाहिली. एम.जी.एम.विद्यापीठाने त्यांना मरणोत्तर डी. लीट पदवी बहाल करून त्यांचा गौरव केला. आतापर्यंत त्यांच्या गीतावर डझनभर लोकांनी डॉक्टरेट केली. वामनदादांच्या गीतांनी दिलेली प्रेरणा आजही लाखो मनांना जागृत करते. १५ मे रोजी होणाऱ्या अभिवादन सभेला नगर पालिकेचे मुख्याधिकारी गणेश पांडे, शिसेनेचे एड. सुमित सरदार, समाजभूषण दिलीप भाऊ जाधव, भिम शक्तीचे संस्थापक प्रा. दादाराव गायकवाड , इंजि. विजय मोरे (रावसाहेब), साहित्यिक प्राचार्य डॉ. गोविंद गायकी, व्हाइस ऑफ मिडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, राजेंद्र काळे, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजितसिंग राजपूत, उपस्थित राहणार आहेत. या अभिवादन सोहळ्यास बहुजन बांधवांनी तसेच साहित्यिक, कलावंत आणि आंबेडकर प्रेमी जनतेनी उपस्थित राहावे असे आवाहन लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठानच्या वतीने शाहिर डी. आर. इंगळे, साहित्यिक सुरेश साबळे, सिद्धार्थ आराख यांनी केले आहे.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button