गैरआदिवासी जमातींना अनुसूचित जामातीचे प्रमाणपत्र देऊ नये जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी…

गैर आदिवासी जमातींना अनुसूचित जामातीचे प्रमाणपत्र देऊ नये जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी…
बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील गैर आदिवासी जातींना अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्यात येऊ नये याकरिता आदिवासी पारधी क्रांती संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील सहा उपविभाग असून सहा विभागांमध्ये गैर आदिवासी जाती वास्तव्यास असून विशेष म्हणजे कोळी समाज मलकापूर मोताळा नांदुरा बुलढाणा चिखली, जळगाव जामोद संग्रामपूर खामगाव शेगाव या तालुक्यात मोठ्या संख्येने वास्तव्यास आहे
महसूल प्रशासनावर आंदोलनाच्या माध्यमातून तसेच राजकीय दबावातून खऱ्या आदिवासींवर अन्याय करून कोळी समाज हा त्यांना स्वतःला आदिवासी समजावून अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी प्रयत्न करीत असून तसेच जिल्ह्यात इतर गैर आदिवासी जाती ह्या अनुसूचित जमातीत शिष्यवृत्ती चा लाभ घेत आहे तो लाभ त्वरित बंद करण्यात यावा व गैर आदिवासी जातींना महसूल प्रशासनाने पाठीशी न घालता त्यांच्यावर खोट्या प्रमाणपत्राच्या आधारित तसेच बनावट प्रमाणपत्रावर लाभ घेतला असले त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे असे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे .
या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना आदिवासी पारधी क्रांती संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनावर जिल्हाध्यक्ष विनोद डाबेराव, निलेश सोळंके, संतोष चव्हाण, हरसिंग राणे, अतुल जाधव, सुरेश चव्हाण, संदीप सोळंके, गजानन चव्हाण, लक्ष्मण सोळंके आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत



