ग्राम पांग्री काटे शिवारात अफूची शेती 1,32,98400 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत…
उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनात NDPS कायदा अंतर्गत छापा....

ग्राम पांग्री काटे शिवारात अफूची शेती! 1,32,98400 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत…
- उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनात NDPS कायदा अंतर्गत छापा….

दिनांक १६/०२/२०२६ रोजी मेहकर, पांग्रीकाटे, साखरखेर्डा पेट्रोलींग करीत असतांना गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या खबरे प्रमाणे ग्राम पांग्री काटे शिवारात भागवत सदाशीव काटे रा. पांग्री काटे आणि विशाल रमेश काटे रा. पांग्री काटे हे आपले गट नं. १४८ आणी गट नं. १२८ मधील शेतात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेल्या अफु पिकाची लागवड करुन तिला पाण्याची व्यवस्था करुन तिचे संवर्धण करुन संगोपन करतांना मिळुन आल्याने त्यांचेवर NDPS कायदा प्रमाणे छापा कार्यवाही टाकुन मोक्यावर अफु पिकासह पकडले भागवत सदाशीव काटे याचे कडुन प्रतिबंधीत अफु पिकाचे बोंड, फुले पाने असलेली झाडे एकुण वजन १०७ किलो ६६० ग्राम किमती अंदाजे ८६,१२,८०० रु. तसेच विशाल रमेश काटे याचे कडुन प्रतिबंधीत अफु पिकाचे बोंड, फुले पाने असलेली झाडे एकुण वजन ५७ किलो ३२० ग्राम किमती अंदाजे ४५,८५,६०० रु. असा एकुण १,३२,९८,४०० रुपयाचा मुददेमाल हस्तगत करुन दोन्ही आरोपी विरुध्द गणेश कड वाचक पो.उप.नि. उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय मेहकर यांचे तक्रारीवरुन अपराध क्रं. ७३/२०२६ कलम ८ (क), १८ (क) NDPS Act प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास साखरखेर्डा पोलीस करीत आहेत. सदर कार्यवाही श्री. निलेश तांबे पोलीस अधिक्षक बुलढाणा, श्री. अमोल गायकवाड अपर पोलीस अधिक्षक बुलढाणा यांचे मार्गदर्शनात संतोष खाडे उपविभागीय पोलीस अधिकारी मेहकर यांनी त्यांचे पथक स.पो.नि. गजानन करेवाड, पो.उप.नि. गणेश कड, पो.हे.कॉ. डिगांबर चव्हाण ब.नं. ५१२, पो.हे.कॉ. सुनील देशमुख ब.नं. ४३४, पो.हे.कॉ. उमेश घुगे ब.नं. ४२२, पो.कॉ. किशोर बोरे ब.नं. ४१२, पो.कॉ. आकाश काळदाते ब.नं. २७०१ चालक पो.कॉ. सलीम गवळी ब.नं.२४००, RCP पथक तसेच श्री. संदीप बंगाळे नायब तहसीलदार सिंदखेड राजा, आनंद राजपुत ग्राम महसुल अधिकारी, श्री. कोल्हे कृषी सहायक, श्री. आनंदा शिंदे दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, फॉरेन्सिक मोबाईल पथक बुलढाणा, अंमली पदार्थ शोधक श्वान पथक बुलढाणा केली आहे




