जयश्री ताईंच्या विजयासाठी महिला उतरल्या मैदानात रॅलीत उत्स्फूर्त प्रतिसाद

जयश्री ताईंच्या विजयासाठी महिला उतरल्या मैदानात रॅलीत उत्स्फूर्त प्रतिसाद
बुलढाणा
आम्ही सर्व भारतीय आहोत.. ही भावना रुजवून देशातील विविध धर्मांतील बांधवांना एकाच सूत्रात बांधण्याचे काम महाविकास आघाडी करते. याचाच प्रत्येक सध्या महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्रीताई शेळके यांच्या प्रचार रॅलीमध्ये येत आहे. ताईंसाठी भगवा,पिवळा, निळा व हिरवा ध्वज एकवटला असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू हळूहळू सरकत आहे
महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सर्वच नेते एकजूट पणे त्यांच्या प्रचारासाठी उतरले आहेत. सर्वांचा एकच ध्यास दिसतय, तो म्हणजे ताईंना विधानसभेत पाठवू या
याच एकाच हेतूने महाविकास आघाडीतील नेते कामाला लागले असल्याचं बोललं जात आहे. तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते व समर्थक त्यांच्या रॅलींना प्रचंड गर्दी करीत आहेत. त्यामुळे ताईच्या रॅलीमध्ये सर्वच जाती धर्मातील मतदार स्वयंस्फुर्तिने भगवा,पिवळा,निळा व हिरवा ध्वज हाती घेऊन त्यांच्या पाठीशी उभे आहेत. कोणावर टीका टिप्पणी न करता केवळ मतदार संघाचा विकास हाच केंद्रबिंदू ठेऊन ताई मैदानात उतरल्या आहेत. त्यांना बुलढाणा शहरासह संपूर्ण मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतदारांचा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस बुलढाणा मतदारसंघातील लढत ही महाविकास आघाडीच्या बाजूने होत असल्याचे संकेत मिळत आहेत. प्रचाराची योग्य नियोजन, उत्कृष्ट संघटन आणि गावागावात होत असलेल्या नियोजन पूर्ण बैठकी पाहता ताईंचा विजय सुनिश्चित मानला जात असल्याची चर्चा सर्वसामान्यांमध्ये होत आहे