बातमी

जानेफळ येथे मंगळवारी धडाडणार खा मुकुल वासनिक यांची तोफ प्रचार सभेला हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा – देवानंद पवार

जानेफळ येथे मंगळवारी धडाडणार खा मुकुल वासनिक यांची तोफ

प्रचार सभेला हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा – देवानंद पवार

 

 

मेहकर/प्रतिनिधी
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर विधानसभेचे शिवसेना
(उबाठा),महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ रामभाऊ खरात यांच्या प्रचारासाठी जानेफळ येथे काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खा मुकुल वासनिक साहेब यांची जाहिर प्रचारसभा होणार आहे. मंगळवार दि.12 नोव्हेंबरला खासदार मुकूल वासनिक यांची तोफ धडाडणार आहे. या सभेतून सिद्धार्थ खरात यांच्यासह महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन काँग्रेसचे मेहकर तालुका अध्यक्ष देवानंद पवार यांनी केले आहे.

मेहकर विधानसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ खरात यांच्या प्रचारासाठी खा मुकुल वासनिक हे जानेफळ येथे जाहीर सभा घेत आहेत. १२ नोव्हेंबरला दुपारी २ वाजता ही सभा होणार आहे. या सभेला महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी , लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते तसेच शिवसैनिक यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन काँग्रेसचे तालुका प्रमुख देवानंद पवार शिवसेना तालुका प्रमुख निंबाभाऊ पांडव यांनी केले आहे.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button