बातमी

जिजाऊच्या मातीने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला लढण्याचा विचार दिला :- हर्षवर्धन सपकाळ

जिजाऊच्या मातीने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला लढण्याचा विचार दिला :- हर्षवर्धन सपकाळ

महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची निवड झाली या निवडीनंतर ते बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील संत चोखामेळा यांच्या दर्शनासाठी व त्यानंतर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या जन्माने पुनित झालेल्या मातृत्व सिंदखेड राजा येथे जिजाऊ मा साहेबांच्या दर्शनासाठी आले होते त्यावेळी त्यांनी ही माती शौर्याची माती आहे, ही प्रेरणेची माती आहे, याच मातीने मी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना शासकीय स्तरावरील जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्याची संधी मला मिळाली आणि हा उत्सव मी सुरू करू शकलो. लौकिक अर्थानं मी स्वतःला भाग्यवान समजतो असे भावनिक गौरव उद्गार या प्रसंगी नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काढले. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्याम बाबू उमाळकर सिनखेडराजा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शिवदासजी रिंढे,दत्ता भाऊ काकास बुलढाणा, लोकजागर परिवाराचे मुख्य विश्वस्त प्रवीणभाऊ गीते,जिल्हा परिषद सदस्य अशोकराव पडघान जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष रमेशदादा कायंदे,समाधान सुपेकर, राज्याचे सोशल मीडियाचे उपाध्यक्ष समाधान ओव्हाळ,पदाधिकारी सुनीलभाऊ जायभाये, युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष अनिकेत मापारी, सत्यजित खरात, कलीम खान पि,के वाघमारे अमोल ठाकरे, राहुल साबळे,सिद्धार्थ बेंदाडे,या सह अनेक मान्यवर तथा सिनखेडराजा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते..

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button