जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सत्कार
प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले...

जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सत्कार
बुलढाणा आज दिनांक 26 जानेवारी, 2025 रोजी पी.एम.किसान, पीक विमा योजना व सांख्यिकी विषयक योजनांचे जिल्हास्तरावर उत्कृष्टपणे नियोजन केलेबद्दल मा.ना.पालकमंत्री साहेब यांच्या हस्ते श्रीमती संजीवनी राधेश्याम कणखर, तंत्र अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बुलढाणा यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
श्री.नितीन बद्रीनारायण भंडारे, कृषि सहाय्यक, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बुलढाणा यांनी नैसर्गिक आपत्ती विषयाचे काम जिल्हास्तरावर सतत 8 वर्षांपासून सांभाळत असून सर्व अहवाल निधी मागणीसह वेळेत सादर केल्याबद्दल व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान मदत वेळेत मिळाल्याबद्दल त्यांच्या उत्कृष्ट कामगिरी करिता मा.जिल्हाधिकारी, बुलढाणा यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
श्री.राहुल पांडुरंग वानखेडे कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी, चिखली यांनी सन 2024-25 या वर्षांमध्ये आत्मनिर्भर पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेत जिल्ह्यात सर्वाधिक 34 कर्ज मंजूर प्रकरणे पूर्ण केली व मुख्यालयातील शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळवून दिला त्याबाबत मा. जिल्हाधिकारी यांनी प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले.
श्री.रविंद्र बाळासाहेब जाधव, कृषि सहाय्यक तालुका कृषि अधिकारी, संग्रामपूर यांनी सन 2024-25 या वर्षांमध्ये महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना (फळबाग लागवड) व भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत जिल्ह्यात सर्वाधिक 165.00 हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड पूर्ण केली असून मुख्यालयातील शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळवून दिला असून मा.जिल्हाधिकारी, बुलढाणा यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात आले आहे.



