जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय देऊळघाट येथे नवागतांचे स्वागत करण्यासाठी शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय देऊळघाट येथे नवागतांचे स्वागत करण्यासाठी
शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा
बुलढाणा पी एम श्री जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय देऊळघाट या शाळेत आज दिनांक 23 जून 2025 रोजी शाळेत शासन निर्णयानुसार शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. नवीन प्रवेशित आणि सर्व विद्यार्थ्यांची ढोल पथकासह गजरात प्रभात फेरी काढण्यात आली. याप्रसंगी नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक, मोफत गणवेश, मोफत बूट सॉक्स आणि शाळेच्या मुख्य प्रवेशव्दारावर पुष्पगुच्छ देऊन तसेच गुलाब पुष्प पाकळ्यांचा वर्षाव करून शाळेचे प्राचार्य आर. आर. सय्यद, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. अलकाताई किटे, उपाध्यक्ष श्री. शैलेश सब्बलवार, शिक्षणतज्ञ श्री. अमोल जाधव आणि इतर सदस्य गण तसेच शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारीवृंद यांच्या हस्ते आनंददायी व प्रसन्न वातावरणात शाळेच्या मुख्य् प्रवेशव्दारावर स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी वरिष्ठ कार्यालयाचे अधिकारी, डॉक्टर महेंद्र सरपाते तालुका आरोग्य अधिकारी, पंचपायत समिती बुलढाणा आणि डॉक्टर रणजीत मंडले, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद बुलढाणा यांनी शाळा प्रवेशोत्सवा बाबत शाळेस भेट देऊन शाळेची पाहणी केली आणि शालेय कामकाज, नियोजन, स्वच्छता व शालेय प्रशासनाबाबत समाधान व्यक्त केले.
शाळा प्रवेशोत्सवाची औचित्य साधुन “एक पेड मा के नाम” या उपक्रमांतर्गत नवीन प्रवेशित विद्यार्थी आणि त्यांच्यासोबत त्यांच्या उपस्थित माता-भगिनी तसेच डॉक्टर महेंद्र सरपाते तालुका आरोग्य अधिकारी बुलढाणा, आणि डॉक्टर रणजीत मंडले अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद बुलढाणा व प्राचार्य आर आर सय्यद आणि उपस्थित पालकवर्ग, शिक्षकवृंद यांच्या हस्ते शाळेमध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
शाळा प्रवेशोत्सवाचे औचित्य साधुन नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचा शाळेत प्रवेशित होण्याचा क्षण स्मृतीबध्द करण्यासाठी शाळेमध्ये तयार करण्यात आलेला सेल्फी पॉइंट हे आकर्षणाने केंद्र होते. विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांनी सेल्फी घेतल्याचा आनंद घेऊन हा प्रवेशोत्सवाचा क्षण स्मृतिबद्ध केला.
याप्रसंगी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रणजीत मंडले यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व आणि सुदृढ आरोग्यासाठी चांगल्या आरोग्यदायी सवयी आणि त्याचा अध्य्यन-अध्यापन प्रक्रियेशी संबंध यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्य आर. आर. सय्यद यांनी त्यांचे भाषणातून शंभर टक्के पट नोंदणी, शाळेमध्ये विद्यार्थी संख्या वाढीसाठी शिक्षकवृंदांचे प्रयत्न, शालेय गुणवत्ता वृद्धी साठी शाळेतील सर्व शिक्षक वृंदांचे उत्तम नियोजन आणि शिक्षक वृंदांची उच्च विद्या विभूषित पदव्या व ज्ञान याचा या शाळेतील विद्यार्थ्यांना फायदा होत असल्याबाबत आणि यापुढे सुद्धा उत्कृष्ट गुणवत्ता वृद्धी आणि पालकांचा शाळेवरील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विश्वास या कसोटीवर खरे खरे उतरण्यासाठी आणि त्यांचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा मनोदय व्यक्त केला.
या कार्यक्रमासाठी मौजे देऊळघाट येथील अंगणवाडी सेविका आशा वर्कर पालक आणि गावकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अनिल सखाराम कड, श्री मोहम्मद सलमान, श्री प्रल्हाद शेनफड गायकवाड यांनी केले तर आभारप्रदर्शन श्री. सय्यद अनिस यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी नियोजनशीर पणे प्रयत्न केले.
शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना नवीन गणवेश, बुट-सॉक्स्, आणि पाठ्यपुस्तके मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य् व आनंद निर्माण झाला. विद्यार्थ्यांना याप्रसंगी गोड भात / खिर चे वाटप करुन कार्यक्रमाची सांगता झाली.