बातमी

डोंगरखंडाळ्यात कायदेविषयक जनजागृतीसाठी कार्यशाळा

डोंगरखंडाळ्यात कायदेविषयक जनजागृतीसाठी कार्यशाळा

बुलढाणा : बुलढाणा जिल्हा पोलिस दल, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता व भारतीय साक्ष अधिनियम या तीन कायद्याच्या प्रसार व प्रसिद्धीसाठी १० फेब्रुवारी रोजी डोंगरखंडाळा ग्रामपंचायतमध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये कायदेविषयक साक्षरता असणे अत्यावश्यक आहे. यानुषंगाने नव्याने लागू करण्यात आलेल्या कायद्यांची देखील माहिती सर्वसामान्यांना देण्यात आली. कार्यशाळेस बुलढाणा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक गजानन कांबळे यांची प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थिती होती. ॲड. विक्रांत मारोडकर यांनी भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 व भारतीय साक्ष अधिनियम 2023 या तिनही कायद्यांबाबत मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच प्रज्ञा कांबळे गोराडे, उपसरपंच श्याम पाटील सावळे, ग्रामपंचायत अधिकारी टी. आर. सदावर्ते, बीट जमादार महादेव इंगळे, ग्रा. पं. सदस्य यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button