बातमी
डोंगरशेवली शिवारात अस्वलाच्या हल्ल्यात महिला जखमी
अधिकाऱ्यांनी जखमीची घेतली भेट : उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल

डोंगरशेवली शिवारात अस्वलाच्या हल्ल्यात महिला जखमी
* अधिकाऱ्यांनी जखमीची घेतली भेट : उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल
बुलडाणा
शेतात तुरची तोडणी करत असतांना अचानक एका अस्वलाने 35 वर्षीय महिलेवर हल्ला केला. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेऊन जखमी महिलेची भेट घेतली.
याबाबत प्राप्त माहिती अशी की, चिखली तालुक्यातील डोंगर शेवली येथील रहिवासी अश्विनी विनोद सावळे वय 35 वर्ष ह्या आज 7 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास गावाला लागून असलेल्या आपल्या शेतात गेल्या होत्या. तूर काढणी करतांना दबा धरून बसलेल्या अस्वलाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. अश्विनी सावळे यांचा आवाज ऐकून आजूबाजूच्या शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी अश्विनी सावळे यांच्याकडे मदतीला धावून आले. शेतकऱ्यांचा ओरडण्याचा आवाज येत असल्याने अस्वल तिथून पळून गेला. या हल्ल्यात अश्विनी सावळे यांना गंभीर दुखापत झाली आहे. नातेवाईकांनी तात्काळ त्यांना बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घटनेची माहिती मिळताच अश्विनी आपेट, आरएफओ अभिजीत ठाकरे, वनपाल प्रफुल मोरे, वनरक्षक रानी जोगदंड यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन जखमी महिलेची भेट घेतली.



