क्रीडा बातमी

तीन दिवस या कबड्डी सामन्यांना सुरुवात

डोणगाव: येथील श्री संत गजानन महाराज संस्थेच्या वार्षिक महोत्सवाला 29 नोव्हेंबर प्रारंभ झाला या महोत्सवात कबड्डी सामने आयोजित करण्यात आले असून या सामन्यांना रविवारी सुरवात करण्यात आली या सामन्यांचे उद्घाटन विदर्भ रत्न ह भ प संजय महाराज पाचपोर संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर गजानन उल्हामाळे युवा नेते रिशी जाधव निरीज रायमुलकर यांच्या हस्ते करण्यात आले या स्पर्धेत 49 संघांनी सहभाग नोंदविला आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुबोध आखाडे चेतन जाधव तुषार आखाडे अक्षय परमाळे राजू बशिरे राम पिसके दीपक इंगळे विजय भंडारे मुन्ना आंबेडकर गजानन जाधव यांनी परिश्रम घेतले या स्पर्धेत प्रथम विजेत्या संघाला एकतीस हजार एक तर द्वितीय विजेत्या संघाला 22 हजार एक रुपये तर तृतीय स्थान पटकाविणाऱ्या संघाला 11001 चतुर्थ बक्षीस 7777 रुपये देण्यात येणार आहे या महोत्सवानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमामुळे डोणगाव नगरीला यात्रेचे स्वरूप आले आहे

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button