बातमी

“त्वरा करा अजाच खरेदी करा मर्यादीत स्टॉक”

बुलढाणा अर्बन कंझ्युमर स्टोअर्स तर्फे गहु विक्रीस उपलब्ध.. 

बुलडाणा अर्बन चे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री.राधेश्याम चांडक(भाईजी)तथा बुलडाणा अर्बन चे अध्यक्ष डॉ. सुकेशजी झंवर साहेब आणि बुलढाणा अर्बन चॅरिटेबल संस्थेच्या अध्यक्षा सौ.कोमल सूकेशजी झंवर यांच्या मार्गदर्शनातून बुलढाणा अर्बन कंझुमर स्टोअर्स द्वारा नेहमीच नवनवीन उपक्रम राबविण्यात येतात.यामध्ये मध्यप्रदेश येथील उच्चप्रतीचे “शरबती गहु” सभासद ग्राहक व जिल्हावांसीसाठी सदैव विक्रीसाठी उपलब्ध केले जाते. यावर्षी सुद्धा बुलडाणा अर्बन कंझ्युमर स्टोअर्स तर्फे उच्चप्रतीचे “शरबती गहु” मशीन क्लीन विक्रीस उपलब्ध करण्यात आले आहे.

या गहू विक्री केंद्राचे उद्घाटन दिनांक 15 एप्रिल 2025 रोजी बुलढाणा अर्बन संस्थेचे सरव्यवस्थापक श्री.कैलासजी कासट यांच्या शुभहस्ते करण्यात आले आहे.यावेळी प्रथम ग्राहक म्हणून श्री.दिगंबर काळे साहेब, आणि उपस्थित मध्ये श्री. पी. आर.इंगळे साहेब,श्री.किशोर पोपट , श्री.नीनाजी भगत (संकेत फोटो स्टुडिओ), विजय महाले, शरद सोनवणे, प्रशांत शिरसागर, आनंद जाधव, सुरज शर्मा, सुरेश गोविंद सरकटे, समा तायडे, पंजाब पैठणे बुलडाणा अर्बन स्टोअर्स चे व्यवस्थापक श्री.संजय कस्तुरे, कर्मचारी सतीश उबाळे, विकास उबाळे, सुशील वानखडे हे उपस्थित होते. संस्थेच्या सर्व सभासद ग्राहकांनी व बुलढाणा वासियांनी योग्य दरात उच्चप्रतीचा शरबती गहू खरेदी करावा असे आवाहन बुलडाणा अर्बनचे अध्यक्ष डॉ. सुकेशजी झंवर यांनी केले

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button