थरारक लढत: पत्रकार विरुद्ध पोलीस! मैत्रीपूर्ण क्रिकेट सामन्यात पोलिसांचा शानदार विजय…

थरारक लढत: पत्रकार विरुद्ध पोलीस!
मैत्रीपूर्ण क्रिकेट सामन्यात पोलिसांचा शानदार विजय…
बुलडाणा: मराठी पत्रकार संघ आणि पोलीस दल यांच्यात आज (दि 4 जानेवारी 2025 रोजी झालेल्या एका रोमांचक आणि मैत्रीपूर्ण क्रिकेट सामन्यात पोलीस संघाने पत्रकार संघावर विजय मिळविला आहे. हा सामना केवळ एक स्पर्धा नसून, दोन्ही महत्त्वपूर्ण स्तंभांमध्ये सामंजस्य आणि सलोखा वाढवणारा एक प्रेरणादायी उपक्रम ठरला.
बुलढाणा येथील पोलीस कवायत मैदान येथे हा सामना मोठ्या उत्साहात खेळला गेला. पत्रकार संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
पत्रकार संघाची सुरुवातीला काही महत्त्वपूर्ण विकेट्स गमावल्यानंतर पत्रकार संघाने झंझावाती खेळीच्या बळावर निर्धारित 10 ओवर्स मध्ये 68 धावांचे आव्हान उभे केले.
पोलीस संघाचा दमदार पाठलाग आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या पोलीस संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. आणि विजय मिळवला.
मात्र या सामन्यामध्ये अटीतटीचा सामना बघायला मिळाला. शेवटच्या क्षणी सहा बॉल मध्ये पाच जणांची आवश्यकता असा क्षण त्या ठिकाणी उभा राहिला आणि एक चौकार आणि एक रणाच्या मोबदल्यात त्यांनी हा विजय मिळवला आहे.
एवढेच न करता जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी परत एक 6 ओव्हरचा सामना ठेवला यामध्ये सुद्धा पोलीस दल संघाचा विजय झाला आहे.
मैत्रीपूर्ण वातावरणात समारोप
सामन्याच्या शेवटी विजेता ट्रॉफी आणि उपविजेता ट्रॉफी वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजित सिंग राजपूत, यांनी दोन्ही संघांचे अभिनंदन केले. त्यांनी दोन्ही घटकांचे परस्पर सहकार्य किती महत्त्वाचे आहे, यावर जोर दिला.
पत्रकार संघाने हा पराभव मोठ्या खिलाडूवृत्तीने स्वीकारला आणि दोन्ही संघांनी एकमेकांचे अभिनंदन केले. या सामन्यामुळे शहराच्या विकासासाठी आणि शांततेसाठी कार्यरत असलेल्या या दोन्ही महत्त्वाच्या घटकांमध्ये एक नवा स्नेहबंध निर्माण झाला आहे.
शेवटी सर्वांसाठी पोलीस दलातर्फे चहा नाष्ट्याचे आयोजन करण्यात आले.
पत्रकार संघातील खेळाडू
कॅप्टन सुधाभाऊ अहेर,उपकर्णधार चंद्रकांत बर्दे,रणजितसिंग राजपूत,राजेश डिडोळकर,गजानन धांडे,अजय राजगुरे,दीपक मोरे,सुनील मोरे, इसरार देशमुख, विकेटकीपर कृष्णा सपकाळ, अनंता काशीकर,अक्षय थिगले, आभिषेक वर्पे,युवराज वाघ,विनोद सावळे,निलेश जोशी हे खेळाडू होते.



