राजकीय बातमी

नवनिर्माण सेनेकडून भैयासाहेब पाटील यांना मेहकर विधानसभेची उमेदवारी जाहीर…

नवनिर्माण सेनेकडून भैयासाहेब पाटील यांना मेहकर विधानसभेची उमेदवारी जाहीर…

मेहकर विधानसभेत धावणार मनसेचे इंजिन…

मागील 20 वर्षांपासून रुग्णसेवा शेतकरी कष्टकरी यांचे प्रश्न घेऊन लढणारे..

मेहकर मतदार संघात गेल्या 20 वर्षांपासून सातत्यपूर्ण नागरिकांच्या शेतकऱ्यांच्या तसेच विद्यार्थ्यांच्या सुशिक्षित बेरोजगारांच्या समस्या जाणून घेत त्या शासन दरबारी सोडवण्यासाठी अविरत प्रयत्न करणारे भैयासाहेब पाटील यांना अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची उमेदवारी जाहीर झाली आहे.
मेहकर लोणार मतदार संघात अगोदर राज्यस्तरावर भारतीय जनता पार्टीत नंतर बी आर एस या पक्षात काम करत असताना गोरगरीब शेतकरी कष्टकऱ्यांच्या साठी सदैव झटणारे तसेच मेहकर लोणार मतदार संघातील नागरिकांसाठी संत गजानन महाराज सेवा समितीच्या माध्यमातून आरोग्य शिबिराचे आयोजन करून त्याच शिबिराच्या माध्यमातून रुग्णांना जळगाव येथील हॉस्पिटल मध्ये नेऊन शस्त्रक्रिया व इतर उपचार करून त्यांची सेवा गेल्या अनेक वर्षांपासून ते करत आहेत त्यामुळे त्यांची जनतेशी नाळ जुळलेली आहे जनतेच्या समस्या विधानसभेत मांडण्यासाठी राज साहेब ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपण उभी असून मी मेहकर विधानसभेच्या निवडणूक रिंगणात उतरलो असल्याचे भैय्यासाहेब पाटील यांनी सांगितले

 

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button