बातमी

नविन फौजदारी कायदे विषयक DYSP महामुनी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळा संपन्न..

नविन फौजदारी कायदे विषयक DYSP महामुनी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळा संपन्न..

बुलडाणा / दी 21 जानेवारी महाराष्ट्र शासन गृह खात्याच्या सुचनेनुसार बुलढाणा जिल्हा पोलीस दल अंतर्गत पोलीस हेडकॉटर मधील प्रभाव येथे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने DYSP बी.बी महामुनी यांच्या अध्यक्षतेखाली फौजदारी कायदे यांचे प्रसार व प्रसिद्धीसाठी कार्यशाळा संपन्न झाली

यावेळी मंचकवर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ऍड सोनाली सावजी,ऍड बावणे मॅडम,ऍड सवडतकर तर प्रमुख पाहुणे SDPO सुधीर पाटील, शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे, ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन कांबळे उपस्थित होते.
प्रास्ताविक मनोगतातून नविन फौजदारी कायदे संदर्भात भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023, भारतीय साक्ष अधिनियम 2023 संदर्भात विस्तृत माहिती यावेळी दिली प्रमुख मार्गदर्शकऍड सोनाली सावजी,ऍड बावणे मॅडम,ऍड सवडतकर यांनी नविन फौजदारी कायदे संदर्भात बहुमोल मार्गदर्शनातून काळ बदलत गेला त्याच प्रमाणे कायद्यात सुधारणा करण्यात आली,या नविन कायद्या नुसार वीखुरलेल्या कायद्यांना एकसंघ करता आले,गुन्हा करण्याची नवीन नवी पध्दत समोर आली असुन त्याच प्रमाणे कायदे सुध्दा करण्यात आले आहे,जसा काळ बदला आहे तसे गुन्हयाचे स्वरुप बदले आहे त्यानुसार नविन कायदे अंमलात आणण्याची गरज होती,ती या नविन कायद्याच्या माध्यमातून पुर्ण झाली आहे, यावेळी प्रामुख्याने पोलीस पाटील, पत्रकार, शांतता समिती सदस्य व परिसरातील जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button