बातमी

नांद्रा कोळी येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन.

 

नांद्राकोळी येथे राजर्षी शाहू महाराज वाचनालय व ग्रामपंचायत नांद्राकोळी संयुक्त विद्या मानाने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विन्रम अभिवादन करण्यात आले. सर्व प्रथम गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. या वेळी जेष्ठ नागरिक दलित मित्र माधव राव हुडेकर, माजी सरपंच व विद्यामान सदस्य संजय काळवाघे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आजची राजकीय, सामाजिक परिस्थिती पाहता,

फक्त औपचारिकता नको विवेकी विचाराणाने मेंदू धून घेतले पाहिजे
आपण आतातरी महामानव समजून घेतले पाहिजे.
ह्या स्वरचित ओळी साहित्यियक अजय जाधव यांनी सादर करून, महामानव यांच्या विचारा प्रति जागृत राहण्याचे आव्हान केले. यावे दलित मित्र माधवरावजी हुडेकर यांनी बाबासाहेब यांच्या जीवनातील आठवणी नां उजाळा दिला, सामाजिक कार्यकर्ते समाधान जाधव यांनी सुद्धा या वेळी मनोगत व्यक्त करून अभिवादन केले. या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य रवी हिवाळे, मोहन जाधव, तंटामुक्ती उप अध्यक्ष अनिल राऊत, राजू हिवाळे, महादू हिवाळे, संजय का ळवाघे,…… यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन संतोष जाधव यांनी केले.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button