बातमी

नागपूर विधानसभेवर 18 डिसेंबरला भूमिहीन,अतिक्रतीत शेतमजूर कर्जदाराचा भूमिहक्क कर्जमुक्ति सत्याग्रह मोर्चा

नागपूर विधानसभेवर 18 डिसेंबरला
भूमिहीन,अतिक्रतीत शेतमजूर कर्जदाराचा भूमिहक्क कर्जमुक्ति सत्याग्रह मोर्चा

महाराष्ट्र राज्य शासनाकडे सतत 30 वर्षापासुन वन व महसुल भुमिहक्क व भूहिनांची 100% कर्जमुक्ति जिं fcगाव पेनटाकळी खडकपूर्णा प्रकल्प ग्रस्त अतिक्रमणधारकांच्या व जिल्हा प्रशासन स्तरिय मागण्यासाठी मराठवाडा विदर्भ खान्देशातील संघटनेच्या प्रलंबीत मागण्यासठी सततच्या लढ्याची दखल विद्यमान सरकारने न घेतल्याने शासनाने नागपूर हिवाळी अधिवशनात भूमि मुक्ति मोर्चा व बहुजन मुक्ती मोर्चा महाराष्ट्र संयुक्त संघटनेच्या मागण्याची घोषणा मा.मुख्यमंत्री यांनी तात्काळ करावी यासाठी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई प्रदीप अंभोरे संयुक्त संघटना
प्रमुख यांचे प्रमुख नेतृत्वात भाई भिमराव खरात (प्रदेशाध्यक्ष) दिनकर घेवंदे (प्रदेश कार्याध्यक्ष) भाई बाबुराव सरदार (राज्य प्रवक्ता) भगवान गवई (मराठवाडा प्रदेशाध्यक्ष) अंबादास वानखेडे (जेष्ठ नेते) रमेश गाडेकर (विदर्भ प्रमुख) अशोक इंगळे,प्रकाश वानखेडे (उत्तर महाराष्ट्र प्रमुख) मधूकर मिसाळ अ.वि.प्रमुख,मुन्ना पराते,दिलीप रामटेकर (नागपुर विभाग)प्रमोद पोहेकर,प्यारसिंग पॉवरा,जुलमाबाई पवार (जळगांव खा) आदिच्या प्रमुख उपस्थितीत दलित अदिवासी भुमिहीनांना वन व महसुल जमीन कायम पट्टे व निवासी घराचे पट्टे भुमिहीनाचे कर्जमुक्ती,स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मीती, मातृतिर्थ बुलडाणा जिल्हाचे सभाव्य विभाजनात बुलडाणा जिल्हाचे मा.जिजाऊ नगर स्वतंत्र जिल्हा नामांतर घोषणा करा व विभाजीत मा जिजाऊ नगर जिल्हा स्वतंत्र उदयनगर तालुका घोषणा करा., आत्महत्या ग्रस्त व अन्याय ग्रस्त शेतकरी शेतमंजुराना आर्थिक मदत, जिगांव प्रकल्प बांधित शेकडो कुंटुंबाना अतिक्रमीत जमीन व निवासी अतिक्रण घराचा एक रक्कमी 10 लक्ष रुपये आर्थिक मोबदला व पुनरवर्सन लाभ देण्यात यावा रमाई व अन्य घरकुल योजना लाभ 1.20 लक्ष वरुन 2.5 लक्ष करण्यात यावा अतिक्रमण धारकाचे ताब्यातील शेतीवर शासनाने सौरऊर्जा प्रकल्प राबवितांना त्याचे पात्र अपात्र निश्चित होई पर्यंत संभाव्य प्रकल्पास स्थगीती द्यावी.बुलडाणा जिल्हा सह राज्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीग्रस्तांना पिक नुकसान भरपाई तात्काळ वाटप करा. यासह विविध मागण्यासाठी यशवंत स्टेडियम नागपुर येथुन निघणाऱ्या भूमिहक्क व कर्जमुक्ति सत्याग्रह मोर्चास बुलडाणा जळगांव,औरंगाबाद,अकोला जिल्हातील अतिक्रमीत जमीन धारकांनी आपल्या नजीकच्या भुसावळ,मलकापुर, नादुरा,शेगांव,अकोला रेल्वे स्थानकांवरुन हजारोच्या सख्येने उपस्थितीत राहण्यासाठी प्रस्थान करावे असे आवाहन संघटनेचे जिल्हानेते भरत मुंडे ईलियासभाई पठाण गजानन जाधव,अनिस खान पठाण,यांनी एका प्रसिध्द पत्रकाद्वारे केले आहे.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button