बातमी

नागरिकांनो, मतदारयादीत नावनोंदणी करा-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

· निवडणूक जनजागृती प्रचाररथाला हिरवी झेंडी

बुलडाणा, दि. 20 (जिमाका): सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024ची प्रशासकीय स्तरावर पूर्वतयारी सुरु असून, मतदारांमध्ये ईव्हीएमबाबत जनजागृती करण्यात येत आहे. या निवडणुकीत मतदान करण्यासाठी नागरिकांनी मतदारयादीत नावनोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी आज येथे केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी प्रचाररथाच्या माध्यमातून विशेष मतदार नोंदणी जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. या निवडणूक जनजागृती प्रचाररथाला जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ केले. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. पाटील बोलत होते.

अपर जिल्हाधिकारी सुनील विंचनकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुहासिनी गोणेवार, उपजिल्हाधिकारी शरद पाटील, सदाशिव शेलार, नायब तहसीलदार संजय बंगाळे आदी यावेळी उपस्थित होते.

ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटबाबत असलेल्या शंकाचे निरसन करण्यासाठी जिल्ह्यात प्रचाररथ फिरून नागरिकांमध्ये विशेष जनजागृती करणार आहे. मतदारांनी त्यांच्या शंकाचे निरसन करून घेताना, मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याकडे जावून आपले नाव मतदारयादी असल्याची खात्री करून घ्यावी. नसल्यास संबंधितांकडून अर्ज घेऊन भरून द्यावा, तसेच ‘व्होटर ॲप’वर जावूनही नावनोंदणी करावी, असे आवाहन डॉ. पाटील यांनी केले. या विशेष जनजागृती मोहिमेमध्ये इव्हीएम मशीन कशा प्रकार कार्य करते, त्यात असलेली पारदर्शकतेची माहिती देण्यात येत आहे. मतदानाच्या दिवशी मतदारांनी मशीनचा योग्य पद्धतीने वापर करून आपला मताधिकार पार पाडावा. त्यासाठी मतदारांनी नावनोंदणी करणे आवश्यक असून, नागरिकांनी या जनजागृती रथाच्या माध्यमातून माहिती करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

मतदारयादीमध्ये नाव नोंदविण्यासाठी निवडणूक विभागाच्या संकेतस्थळावर जावूनही थेट ऑनलाईन नाव नोंदवता येणार आहे. शाळेतील केंद्रस्तरीय मतदान अधिकारी किंवा तहसील कार्यालयात जावूनही नाव नोंदविता येईल. तसेच कुटुंबातील मतदार असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला असल्यास त्याचे मतदार यादीतून नाव वगळण्यासाठी अर्ज करावा. तसेच एका गावातून दुसऱ्या गावात कामानिमित्त स्थलांतरीत झाल्यास नवीन गावात नाव नोंदविता येणार आहे. ते आवश्यक असून, पूर्वी राहत असलेल्या गावातील मतदार यादीतील नाव वगळण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी केले आहे.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button