बातमी
नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे तात्काळ करा – आमदार गायकवाड

- *नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे तात्काळ करा – आमदार गायकवाड*
बुलढाणा
जिल्हयात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे बुलडाणा मतदार संघातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे, त्यामुळे महसूल प्रशासनाने या नुकसानीची तत्काळ दखल घेवून पंचनामे करावे असे आदेश बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय गायकवाड यांनी दिले आहे
जिल्ह्यात तसेच बुलढाणा विधानसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे परिणामी नद्या नाल्यांना पूर आला आहे मोठे-मोठे तलाव धरणे भरले आहेत बुलडाणा व मोताळा तालुक्यात सततच्या पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे नदीकाठच्या पिकांना शंभर टक्के फटका बसला आहे यातील काही भागांची प्रत्यक्ष पाहणी आज आमदार संजय गायकवाड यांनी केली असून बुलढाणा व मोताळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्यात यावे असा सूचना, वजा आदेश दोन्ही तहसीलदारांना दिले आहेत तसेच कृषी सहाय्यक तलाठी व मंडळ अधिकारी यांनी देखील शेतकऱ्यांचे पंचनामे तात्काळ करावे व अहवाल शासनास सादर करण्यात यावे असे आदेश देण्यात आले आहे
*शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देऊ*
बुलडाणा विधानसभा मतदार संघातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आपण शासन स्तरावरून जास्तीत जास्त मदत मिळून देऊ, शासन नेहमीच आपल्या पाठीशी राहिले आहे व राहणार ही आहे त्यामुळे शेतकयांनी चिंता करु नये सर्वाना न्याय मिळेल असे आश्वासन आ संजय गायकवाड यांनी दिले



