पवित्र रमजान महिन्यापूर्वी स्वच्छता मोहीम आणि सुरळीत पाणीपुरवठा करा
ओपन मुस्लिम कोअर कमिटीचे नगर परिषद कार्यालयावर धरणे आंदोलन

पवित्र रमजान महिन्यापूर्वी स्वच्छता मोहीम आणि सुरळीत पाणीपुरवठा करा
ओपन मुस्लिम कोअर कमिटीचे नगर परिषद कार्यालयावर धरणे आंदोलन
बुलढाणा
पवित्र रमजान महिना सुरू होण्यापूर्वी शहरातील मुस्लिमबहुल भागात सुरळीत पाणीपुरवठा व स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी शुक्रवार, 21 फेब्रुवारी रोजी ओपन मुस्लिम कोअर कमिटीच्या वतीने नगर परिषद कार्यालया समोर धरणे आंदोलन करून करण्यात आली.
येत्या 2 मार्चपासून रमजानचा पवित्र महिना सुरू होत आहे. मुस्लिम समाजात पवित्र रमजान महिन्याला खूप महत्त्व आहे. परंतु दुर्दैवाने शहरातील इकबाल नगर, जोहर नगर, कमेला परिसर, मिर्झा नगर, झोपापट्टी परिसर, इंदिरा नगर, जुनागांव, टिपू सुलतान चौक परिसर आदी मुस्लिमबहुल भागात सध्या स्वच्छतेचा आभाव आहे. दररोज स्वच्छतेअभावी सर्वत्र कचरा व घाण पसरलेली आहे. तसेच सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. वरील समस्यांबाबत ओपन मुस्लिम कोअर कमिटी बुलढाणाच्या वतीन 17 फेब्रुवारी रोजी नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन वरील समस्या सोडविण्याची मागणी केली होती. मात्र वरील मागणी वेळेत पूर्ण न झाल्याने शुक्रवार 21 फेब्रुवारी रोजी ओपन मुस्लिम कमिटीच्या वतीने नगर परिषद कार्यालय समोरील धरणे आंदोलन करून जोरदार घोषणा देण्यात आल्या. दरम्यान, मुख्याधिकाऱ्यांनी कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा करून त्यांच्या समस्या गांभीर्याने घेतल्या आणि विभाग प्रमुखांना तत्काळ मुस्लिम बहुल क्षेत्रात स्वच्छता मोहीम, रमजानच्या काळात सुरळीत पाणीपुरवठा, मुस्लिम कब्रस्तानांमध्ये नळ कनेक्शन व स्वच्छता गृहे बांधणे, मुस्लिमबहुल भागात पथदिवे बसवणे आदींबाबत आदेश देण्यात आले. यावेळी अड.राज शेख, सैयद जुनेद डोंगरे, सैयद आसिफ, मुजाहिद शेख, इशु आजाद, जुबेर खान, शानु, भाई, राशिद लाला, कारी कलीम खान, हाफिज रईस, अब्दुल ठेकेदार, मुजीब डोंगरे, मुबश्शीर अहेमद, मो.दानिश अजहर, अड.जुहैर, मो.अशरफ, शेख वसीम, शेख अमान, शेख नदीम, समीर पठान, अबरार मलिक, शेख शफीक आदि उपस्थित होते.