पालखी मार्गाची दुरावस्था कायम राहिल्यास जनआंदोलन आमदार सिद्धार्थ खरात यांचा इशारा

पालखी मार्गाची दुरावस्था कायम राहिल्यास जनआंदोलन
आमदार सिद्धार्थ खरात यांचा इशारा
लोणार (ता.प्रतिनिधी) : शेगाव पंढरपूर पालखी मार्गाची दुरावस्था संत श्री गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी तयार करण्यात आलेल्या पालखी मार्गाची गंभीर दुरवस्था लक्षात घेता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे आमदार सिद्धार्थ खरात यांनी सरकारला दोन जूनपर्यंत मार्ग सुस्थितीत न केल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
वारकऱ्यांची पंढरपूर वारी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना अशा अपूर्ण व धोकादायक रस्त्यावरून वारकऱ्यांचा प्रवास अत्यंत कठीण ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी सरकारला विनंती केली की, उर्वरित दुरुस्त्या तातडीने पूर्ण कराव्यात व दोन जूनपर्यंत पालखी मार्ग सुस्थितीत आणावा.
२०१७ मध्ये लोणार – मेहकर मतदार संघात लोणार ते जानेफळ हा ३४ किमी. चा पालखी मार्ग ४०० कोटी रुपये खर्च करुण वारकऱ्यांच्या सुविधेसाठी हा पालखी मार्ग बनविण्यात आला मात्र त्या मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असुन अंदाजपत्रकानुसार काम झाले नाही. पालखी मार्गा दरम्याण वारकऱ्यांसाठी विसावे बनविले नाही. ह्या रोडला सध्या ६-१० इचांच्या २० ते २५ फुट लांबीच्या भल्या मोठ्या भेगा पडल्या आहेत.
त्यामुळे दुचाकीस्वारांना जीव मुठीत घेऊन चालावे लागते. या भेंगामुळे अनेकांचे अपघात झालेत. काम न करता बिले काढणाऱ्या कंपनीची संपूर्ण चौकशी करून त्यांना काळ्या यादित टाकण्याची मागणी आ. खरात यांनी केली अल्पावधीतच या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. अतिशय निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, संपूर्ण रसत्यावर चिरा व भेगा पडल्या आहेत.

• लोकप्रिय घोषणा करायच्या अन् बोगस कामे करून जनतेच्या डोळ्यातून अश्रू पाडायचे हे खपवून घेतले जाणार नाही. २ जूनला पंढरीच्या वारीसाठी वारकरी निघणार आहेत. त्यापूर्वी जर ह्या मार्गाच्या दुरुस्तीची कामे न झाल्यास वारकऱ्यांना व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मोठे जनआंदोलन
– सिद्धार्थ खरात, आमदार



