पिकविमा साठी बुलढाणा जिल्ह्याला मिळनार 262 कोटी आमदार संजय गायकवाड यांनी अधिवेशनात उपस्थित केला होता प्रश्न

पिकविमा साठी बुलढाणा जिल्ह्याला मिळनार 262 कोटी
आमदार संजय गायकवाड यांनी अधिवेशनात उपस्थित केला होता प्रश्न
बुलढाणा
बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना प्रलंबित पीक विमा तत्काळ मिळावा यासाठी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता त्या अनुषंगाने शासनाच्या वतीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तब्बल 262 कोटी रुपये जाहीर करण्यात आले आहे. सदर निधी लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जाणार आहे.
जिल्ह्यात मागील अनेक दिवसापासून रब्बी आणि खरीप पात्र शेतकऱ्यांचा कोट्यावधीचा पिक विमा रखडलेला आहे. सदर पिक विमा शेतकऱ्यांना मिळवून द्यावा याकरिता शेतकऱ्यांनी विविध प्रकारचे आंदोलन केली या संदर्भात शेतकऱ्यांनी आमदार संजय गायकवाड यांच्याकडे साकडे घातले असता त्यांनी सदर विषय सभागृहात लावून धरला होता. या विषयावर कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी लवकरच शेतकऱ्यांना पिक विमा उपलब्ध करून देऊ अशी आश्वासन दिले होते. त्या अनुषंगाने आता बुलढाणा जिल्ह्यातील रब्बी आणि खरीप हंगामातील पात्र शेतकऱ्यांना तब्बल 262 कोटी रुपयांचा पिक विमा मंजूर करण्यात आला आहे. यातील खरीफ हंगामातील लाभार्थी साठी 161 कोटी रुपये तर रब्बीतील लाभार्थी साठी 101 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे.
सदर रक्कम लाभार्थाच्या खाात्यात पुढील काही दिवसात जमा होणार असल्याने शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण आहे.