पीकविमा मिळाला नाही तर शेतकरी पीकविमा कंपनीवर फसवणूकीचे गुन्हे दाखल करणार* *भैयासाहेब पाटील*

*भालेगाव ता.मेहकर येथे शेकडो शेतकरी पीकविमा पासूनअद्यापही वंचित…
पीकविमा मिळाला नाही तर शेतकरी पीकविमा कंपनीवर फसवणूकीचे गुन्हे दाखल करणार*
*भैयासाहेब पाटील*
हक्काच्या पिकविमा शेतकरी संवाद यात्रेत हजारो पीकविमा तक्रारी प्राप्त….
मेहकर शेतकरी नेते मा. रविकांत तुपकर साहेबांच्या जीवावर बेतलेल्या अन्नत्याग आंदोलनाच्या आणि जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात मुक्काम आंदोलन च्या दणक्याने अखेर पिक विमा कंपनी व सरकारने पिक विम्याचे पैसे जमा करण्यास सुरुवात करावी लागली…. अद्याप ही हजारो शेतकऱ्याचे पीकविमा चे पैसे जमा झाले नाही.मेहकर लोणार तालुक्यातील.सन 2023-24 च्या खरीप व रब्बी पिकांचा बऱ्याच शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला नसल्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांना तात्काळ रब्बी सोयाबीन व खरिपाचा हरभरा गहू रिजेक्टेड/ अॕक्सेप्टेड सरसकट पिक विमा मिळावा याकरिता नायगाव, पाचला, सावत्रा, भालेगाव
या गावामधिल शेकडो शेतकऱ्यांनी पीक विम्याचे फॉर्म तक्रार अर्ज भरून दिले. पुढील कारवाई करण्याच्या दृष्टीने तसेच पिकविम्यासाठी शेतकऱ्यांची एकजूट करत मोठी लढाई मेहकर लोणार तालुक्यामध्ये उभी करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत या लढाईमध्ये शेतकऱ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. शेतकरी नेतेमा श्री रविकांत भाऊ तुपकर यांच्या आदेशाने पीकविमा आंदोलनाची पुढील दिशा ठरवून आमचे सहकारी डॉ टाले आणि सर्व शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते शेतकरी संवाद यात्रा अधिक जोमाने गावोगावी जाणार आहे.