प्रत्येक मुला मुलींनी खेळलंच पाहिजे.. शारीरिक शिक्षक सागर उबाळे सर यांचे आव्हान

प्रत्येक मुला मुलींनी खेळलंच पाहिजे.. शारीरिक शिक्षक सागर उबाळे सर यांचे आव्हान
आज मुलांमध्ये लठ्ठपणा हा सर्वात मोठी समस्या उद्भवत आहे. मुलांमध्ये मुळात लठ्ठपणा हा एक आजाराचा भाग आहे. लठ्ठपणामुळे अनेक 14 ते 18 वर्षे वयोगटातील मुला-मुलींमध्ये अटॅकचे प्रमाण वाढताना आपणास दिसून येत आहे. पूर्वीची मुले मुली ज्या पद्धतीने खेळायची त्या तुलनेत आजचे विद्यार्थी खेळाप्रती उदासीन असल्याचे दिसून येत आहे. पालकही मुलांना मोबाईल देऊन आपल्या जबाबदारीतून मुक्त होत आहे. परंतु मुलांना मोबाईल देणे म्हणजे त्यांच्या आयुष्यात खरा विरंगुळा हरवून घेण्यासारखे आहे. पुढे हेच मुलांचे मोबाईल व्यसन वाढल्यावर मग तेच पालक मुलांच्या नावाने ओरडतात. मुळात मुलांना मोबाईलची सवय त्यांनीच लावलेली असते. त्यामुळे मुलांपेक्षा पालकांमध्ये जनजागृती करण्याची जास्त गरज भासत आहे. मी शारीरिक शिक्षक असल्याने सतत विद्यार्थ्यांच्या गरट्यात असतो. खो खो हा माझा आवडता खेळ आहे. संपूर्ण शरीराचा व्यायाम करणारा हा खेळ आहे. परंतु आज मुलांमध्ये खो खो खेळाप्रती उदासीनता दिसून येत आहे आज पालकांना लवकर रिझल्ट हवे असतात. हे पूर्णत्व चुकीचे असून कोणत्याही खेळ खेळाप्रती तुमच्



